Water Supply in pune, पुण्यात गुरुवारी दिवसभर पाणीपुरवठा नाही; कोणत्या भागातील नागरिकांना फटका? वाचा संपूर्ण यादी - no water supply in pune on thursday supply will be restored on friday with low pressure


पुणे : वारजे जलकेंद्राच्या अखत्यारित येणारा संपूर्ण परिसर आणि पर्वती, चतु:शृंगी; तसेच ‘एसएनडीटी’ जलकेंद्राच्या अखत्यारितील काही परिसराचा पाणीपुरवठा येत्या गुरुवारी (२५ ऑगस्ट) पूर्ण दिवसभर बंद राहणार आहे. दुरुस्तीनंतर शुक्रवारी (२६ ऑगस्ट) कमी दाबाने पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार आहे, असे पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.

या जलकेंद्रांच्या अखत्यारित येणाऱ्या काही भागांत काही ठिकाणी फ्लो-मीटर बसविण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.

आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वीच जळगावमध्ये तणाव; बॅनर फाडल्याने शिवसैनिकांमध्ये संताप

पाणीपुरवठा बंद असणारा भाग

वारजे जलकेंद्र – चांदणी चौक (चौकोनी) टाकी परिसर : पाषाण साठवण टाकी, भूगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती, सेंटिन हिल सोसायटी, मधुबन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी व चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेशनगर, सूरजनगर, सागर कॉलनी, भारतीनगर, बावधन परिसर, सारथी शिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीवन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील भाग, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, बाणेर, बालेवाडी, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी. सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा, मोहन नगर, सूस रोड आदी परिसर.

वारजे जलकेंद्र- गांधी भवन टाकी परिसर : कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे सिटी, होम कॉलनी, सिप्ला फाउंडेशन, रेणुका नगर, हिल ज्यू गार्डन सिटी, पॉप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी परिसर, गोकुळनगर, अतुलनगर, बी. एस. यू. पी स्कीम, महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाउनशीप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, धनंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय परिसर, अथर्व वेद, स्नेहल अमित पार्क, कांचन गंगा, अलकनंदा, शिवप्रभा मंत्री पार्क-२, आरोह सोसायटी, श्रावणधारा झोपडपट्टी सहजानंद (पार्ट), शांतीवन गांधी स्मारक, किर्लोस्कर डिझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, मृण्मयी श्रीमारोज आर्थिक लेन ७ व ९. मुंबई-पुणे बायपास रस्त्याच्या दोन्ही बाजू, शेरावती सोसायटी, सिद्धकला सोसायटी, श्रीराम सोसायटी, गिरीश सोसायटी, तिरुपतीनगर, कुलकर्णी हॉस्पिटल परिसर, हिंगणे होम कॉलनी, मिलेनियम स्कूल, कर्वेनगर गावठाण, तपोधाम परिसर, राम नगर, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड.

वारजे जलकेंद्र-पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी परिसर : बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लब रस्ता, पल्लोड फार्म, शिंद पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉइंट रस्ता.

वारजे जलकेंद्र- जीएसआर टाकी परिसर : कर्वेनगर गावठाण परिसर, तपोधाम सोसायटी, शाहू कॉलनी गल्ली क्रमांक एक ते अकरा, इंगळेनगर, वारजे जकातनाका परिसर, कर्वेनगर कॅनॉल गल्ली क्रमांक एक ते दहा.

एसएनडीटी- एचएलआर आणि एमएलआर : गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनी, कोथरूड संपूर्ण भाग, वडार वस्ती, स्टेट बँक कॉलनी, श्रमिक वसाहत, हॅपी कॉलनी, मेघदूत तेजस नगर, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंदा नगर, जयभवानी नगर, रामबाग कॉलनी, हनुमान नगर, केळेवाडी, गुजरात कॉलनी, गाढवे कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, आयडियल कॉलनी, वडारवाडी, सेनापती बापट रोड, जनवाडी, वैदुवाडी, भोसलेनगर, अशोकनगर, शिवाजी हौसिंग सोसायटी, भांडारकर रोड, प्रभात रोड, आपटे रोड, घोले रोड, सेनापती बापट रोड, पंचवटी, गणेशनगर, एरंडवणे, एसएनडीटी परिसर, कर्वेरस्ता, विद्यापीठ, खडकी परिसर, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, वडारवाडी, पोलिस लाईन, संगमवाडी आदी.

पर्वती- एमएलआर टाकी परिसर : गुरुवार पेठ, बुधवार पेठ, कासेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडियम परिसर, घोरपडे पेठ आदी परिसर.

नवीन व जुने होळकर जलकेंद्र पंपिंग भाग : मुळा रोड, खडकी कँटोन्मेंट संपूर्ण परिसर, एमईएस, एचई फॅक्टरी, हरिगंगा सोसायटी इत्यादी.

चतु:शृंगी टाकी परिसर : औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, पुणे विद्यापीठ परिसर, चिखलवाडी, खडकी, आनंद पार्क, सानेवाडी, आंबेडकर वसाहत, संकल्प पार्क, सकाळनगर, चव्हाणनगर, अभिमानश्री सोसायटी, नॅशनल सिंध सोसायटी, औंध गाव परिसर.



Source link

By jaghit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: