Uncle Nephew Lost His Life In Firing Over Dispute Farm; एकाच कुटुंबातील दोन गटात वाद, काका पुतण्याचा गोळीबारात मृत्यू

मटा वृत्तसेवा, धुळे : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मलगाव शिवारातील पिपल्यापाडा येथे शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील दोन गटात गुरुवारी हाणामारी झाली तसेच पिस्तुलाच्या फैरीही झाडण्यात आल्याने यात काका व पुतण्या ठार झाले तर अन्य पाच जण जखमी झाले. यापैकी एक जण गंभीर आहे. जखमीवर नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. अद्याप आरोपींना अटक झालेली नाही. आरोपीकडे गावठी पिस्तूल वा तलवारी आल्या कुठून? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मध्य प्रदेशच्या सीमेलगत मलगावजवळील (ता. शहादा) पिपल्यापाडा येथे एकाच कुटुंबातील दोन गटांत शेतजमिनीचा वाद होता. त्यावरून दोन्ही गटांत शेतातच हाणामारी झाली. हाणामारीत तलवारी, विळा, लाकडी दांडके आदी हत्यारांचा वापर करण्यात आला. हाणामारी एवढ्यावरच न थांबता थेट गावठी पिस्तुलातून दोन फैरी झाडण्यात आल्या.

गर्भवती महिलेसह बाळाच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; मेडिकल रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड
गोळीबारात अविनाश सुकराम खर्डे (वय २६, रा. मलगाव, ता. शहादा) जागीच ठार झाला, तर त्याचे काका रायसिंग कलजी खडे (५४) यांचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. सुकराम कलनी खर्डे (वय ४२), गणेश दिवाण खर्डे (२४), रामीबाई दिवाण खडें (सर्व रा. मलगाव, ता. शहादा), सुनील राजेंद्र पावरा (२३), अरुण राजेंद्र पावरा (दोघे रा. बेडिया, ता. पानसेमल, मध्य प्रदेश) आदी पाच जणांचा जखमीमध्ये समावेश आहे.

Maharashtra Weather Forecast: जुलैमध्ये झोडपलं, ऑगस्टमध्ये किती बरसणार? पुढील २ आठवड्यांसाठी असा आहे पावसाचा अंदाज
यात अविनाश खर्डे यांचे वडील सुकराम यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेत १४ आरोपींचा समावेश असून, शहादा पोलिसात देवेसिंग रायसिंग खर्डे व सोनीबाई गणेश खर्डे यांनी परस्परविरोधी फिर्यादी दाखला केल्या आहेत.

तरुणीवरील हल्ल्याने पुणे सुन्न! बचावास गेलेले अनेक जण जखमी; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरारक अनुभव

Source link

By jaghit