toll collection at hativale was stopped, काम पूर्ण करा, मगच...; निलेश राणेंची आक्रमक भूमिका; हातीवले येथील टोल वसुली बंद पाडली - toll collection at hativale was stopped in ratnagiri

रत्नागिरी: कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यातील हातीवले येथील टोल वसुलीवरून मोठे आंदोलन करण्यात आले. टोल वसुलीच्या विरोधात माजी खासदार निलेश राणे देखील सहभागी झाले. जोपर्यंत टोल वसुली थांबवली जात नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही, अशी आक्रमक भूमिका राणे यांनी घेतली. अखेर या आंदोलनाला यश मिळाले आणि अधिकाऱ्यांनी टोल वसुली बंद केल्याचे सांगितले. सिंधुदुर्गपासून रायगडपर्यंत कोणताही टोल नाका सुरू नाही. मग हाच हातीवले टोलनाका सुरू का यासाठी सर्वपक्षीय आंदोलन सुरू करण्यात आले होते.

हातीवले टोल वसूली विरोधात सर्वपक्षीय आंदोलनात आक्रमक भूमिका घेण्यात आली. तुम्हाला पाच मिनिटे देतो अन्यथा मी कुलप लावून जातो. किती वेळ अधिकारी फोनवर बोलतायत मी सगळीकडे कुलप लावून जाणार केस माझ्यावर दाखल करा, असा संतप्त निलेश राणे यांनी प्रशासनाला दिला. या सर्वपक्षीय आंदोलनात काँग्रेसच्या महिला नेत्या हूसनबानू खलिफेही सहभागी झाल्या होत्या.

वाचा- करोनावर सर्वात अचूक भविष्यवाणी करणाऱ्या IIT कानपूरने केला मोठा दावा; भारतात लॉकडाऊन…

रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार निलेश राणे यांनी हातीवले येथे येऊन टोलवसूली बंद पाडली. काम अपूर्ण असताना टोल वसूल कराल खबरदार, असा थेट इशारा त्यांनी दिला. या टोल नाक्यापासून सहाशे मीटर अंतरावर काम सुरू आहे, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. काम पूर्ण करा, मग आमचे काही म्हणण नाही, आमचा टोलला विरोध नाही अशी ठाम भूमिका निलेश राणे यांनी घेतली होती.

वाचा- BF.7 किती धोकादायक? भारतात अलर्ट; राज्यांनी सुरू केली तयारी, लागू

आंदोलनाच्या ठिकाणी प्रांताधिकरी वैशाली माने, तहसीलदार शितल जाधव घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांच्याशी नीलेश राणे यांनी संवाद साधला. यावेळी केंदीय मंत्री नितीन गडकरी व नारायण राणे यांनाही आम्ही संपर्क करण्यात आला. मात्र ते सभागृहात होते. तुम्ही प्राशासन म्हणून काय भूमिका घेणार असा सवाल प्रांताधिकरी वैशाली माने याना राणे यांनी विचारला.

Source link

By jaghit