याप्रकरणी पोलिसांनी पंढरीनाथ परसराम वाघचौरे (वय २८ वर्षे, रा. धनगरवाडी, औराळा ता. कन्नड), काकासाहेब परसराम वाघचौरे (वय ३४ वर्षे, रा. धनगरवाडी, औराळा,कन्नड), दिनेश उर्फ पप्पु संताराम साळूंके (वय २२ वर्षे, रा. कविटखेडा ता. कन्नड) या आरोपींना ताब्यात घेतलं आहे नावे आहेत.
हेही वाचा –पाठलाग करुन, रस्ता अडवून मैत्रीची जबरदस्ती; अल्पवयीन रोड रोमिओमुळे १७ वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, सागर गेल्या २० नोव्हेंबर पासून बेपत्ता होता. सागरच्या नातेवाईकांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. दरम्यान, कन्नड तालुक्यातील औराळा येथील पेडकवाडी घाटातील पाईपमध्ये तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता मृतदेह प्लास्टिक आणि साडीमध्ये गुंडाळलेला होता.
हेही वाचा –ताबा सुटला, कारची कठड्याला जोरदार धडक; मुलांच्या डोळ्यादेखत वडिलांचा मृत्यू
बेपत्ता असलेल्या सागरच्या वर्णनाशी मृतदेहाचे वर्णन मिळते जुळते असल्याने पोलिसांनी सागरच्या नातेवाईकांना बोलावून घेतले असता तो मृतदेह सागरचाच असल्याची ओळख कुटुंबीयांनी पटवली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली असता काही दिवसापूर्वी त्याचा वाद झाल्याची गुप्त माहिती पोलिसांना तपासात मिळाली.
हेही वाचा –सकाळी मुलीचा जन्म सायंकाळी आई लखपती, महिलेच्या घरी लक्ष्मी चालून आली…
पोलिसांनी तिन्ही संशयित तरुणांना तब्यात घेऊन विचारपूस केली असता सागर ने सर्वांसमोर उधार दिलेल्या पैशांची मागणी केली होती. त्यामुळे रागाच्या भरात सागरची हत्या करून मृतदेह पाईपमध्ये लाविल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.