मुंबईप्रमाणे ठाण्यात देखील गोवरने कहर केला आहे. आत्तापर्यंत ठाण्यात गोवरचा दुसरा बळी गेला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. तर भिवंडी परिसरात ३ जणांचा गोवरमुळे बळी गेला आहे. ठाण्यातील मुंब्रा परिसरात मागील आठवड्यात साडेसहा वर्षीय मुलीचा मृत्यु झाला होता, त्यानंतर काल गुरूवारी मुंब्रा येथील कौसा परिसरात दीड वर्षीय बाळ गोवरमुळे दगावले आहे.
महापालिका प्रशासनाकडून सर्वेक्षण सुरु
वाढत्या गोवरच्या प्रादुर्भावामुळे महापालिका प्रशासनाकडून ठाण्यातील मुंब्रा कौसा परिसरात मोठ्या प्रमाणात सर्वेक्षण सुरु आहे. तसेच ज्या बालकांचे २ गोवरचे डोस पूर्ण झालेले नाहीत, अशांना लसीकरण सुरु आहे. मात्र या परिसरातील नागरिकांनी पालिकेच्या सुरु असलेल्या सर्वेक्षणाला विरोध केला असल्याची माहिती समोर आली होती. आता ठाण्यातील मुंब्रा परिसरात गोवरमुळे बळी गेलेल्यांमध्ये लसीकरण ना झाल्यामुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मुंबई हादरली! १३ वर्षांच्या मुलीसोबत शाळेतच सामूहिक अत्याचार, चौघांनी वर्गात कोंडून ठेवले नंतर…
औरंगाबादमध्ये १४ गोवर संशयित बालके
औरंगाबादमध्ये नेहरुनगर, चिकलठाणा, विजयनगर या तीन वसाहतींमध्ये गोवर आजाराचा उद्रेक झाला असल्याचे महापालिकेने गुरुवारी (१ डिसेंबर) जाहीर केले आहे. गुरुवारी सात बालके गोवरबाधित आढळून आली,तर १४ बालके गोवर संशयित म्हणून आढळून आली.
हा तर निसर्गाचा चमत्कार! पुण्यात चक्क झाडाला लगडले बटाटे, पाहण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी
नागपूर शहरात १७ गोवर संशयित बालके
राज्यात काही भागात गोवर (मीझल्स) ची साथ पसरत असल्याने नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे गोवर संसर्गापासून सुरक्षेच्या दृष्टीने नागपूर शहरातील बालकांच्या प्रतिबंधात्मक लसीकरण अभियानाची सुरुवात करण्यात आलेली आहे. बुधवारपर्यंत १ लाख ८९ हजार ९४७ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात ५ वर्षाखालील ५२४०६ बालकांची नोंद करण्यात आली असून शहरात १७ गोवर संशयित बालके आढळली होती.