नेमकं प्रकरण काय?
संजय शिरसाट यांनी २०१७ साली आपल्या पुत्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला केटरिंग व्यावसायिक त्रिशरण गायकवाड यांना ऑर्डर दिली होती. ही ऑर्डर एकूण साडे चार लाख रुपयांची होती. त्यातील काही रक्कम शिरसाट यांनी दिली. पण उरलेल्या रकमेसाठी त्यांनी मला त्रास दिला. मी कित्येक फोन केल्यानंतर काहीतरी डिस्काऊंट कर म्हणून मी त्यांना ७५ हजारांची सूट दिली. त्यानंतर ४० हजार रुपये देण्याचं त्यांनी कबूल केलं.
पण मी जेव्हा पैसे आणायला त्यांच्या कार्यालयात गेलो, तेव्हा त्यांनी मला केवळ २० हजार रुपये दिले. त्यानंतर मी सिद्धांत शिरसाठ यांना फोन केला असता, साहेबांनी दिले तेवढेच पैसे घे… आता पैसे मागू नको… तुला जर ४० हजार रुपये पाहिजे होते, तर मग आम्ही दिलेले २० हजार रुपये तू का घेतले, असा प्रश्न विचारत तू जर असेच पैसे मागत राहिला तर तुझे हातपाय तोडेन, अशी उघड धमकीच सिद्धांत शिरसाट यांनी व्यावसायिक त्रिशरण गायकवाड यांना दिली.
घडलेल्या प्रकारावर आणि दिलेल्या धमकीवर आमदार संजय शिरसाट किंवा त्यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांचं कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही. याप्रकरणात ते काय स्पष्टीकरण देतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे. अद्याप तरी पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाहीये.