राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतमालाच्या दरवाढीसाठी केलेल्या आंदोलनांचा त्या कवितेच्या माध्यमातून दिला आहे. कांदा दराचं आंदोलन शेतकऱ्यांनी केलं, त्यावेळी कवडीमोल भावानं तो विकावा लागला पण तुमच्या भाज्या बेचव होऊ दिल्या नाहीत, असं राजू शेट्टी म्हणाले.
ऊस दर आंदोलनाच्या काळात कारखाने बंद केले होते पण चहातला गोडवा कमी होऊ दिला नाही, असं राजू शेट्टी म्हणाले.
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी विविध ठिकाणी सरकारी कार्यलयांना शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला पण महिला कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ दिली नाही, असं राजू शेट्टी म्हणाले.
राजू शेट्टी यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये राज्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसानं, गारपिटीनं शेतीच्या झालेल्या नुकसानाचा दाखला देत कर्मचाऱ्यांना शेतीच्या नुकसानाची आठवण करुन दिली आहे.
अवकाळी पावसाच्या काळात गारपीट झाल्यानं फळबागा गेल्या आहेत, हाता तोंडाशी आलेली पीक गेली आहेत. त्यामुळं सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळं पंचनामे रखडले आहेत. शेतकऱ्यांच्या स्थितीकडे पाहता संपकरी कर्मचाऱ्यांनी त्याचा निर्णय घ्यावा, असं आवाहन राजू शेट्टी यांनी केलं होतं.
दरम्यान, राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी गेल्या सात दिवसांपासून सुरु असलेला संप मागं घेतला आहे. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर कर्मचारी संघटनांनी संपातून माघार घेतली. कर्मचाऱ्यांनी तीन महिन्यांची मुदत सरकारला दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत या संदर्भातील निर्णयांची माहिती दिली. सोबतचं कर्मचारी संघटनांचे आभार देखील त्यांनी मानले. कर्मचारी उद्यापासून कामावर हजर होणार आहेत.