Radhakrishna Vikhe Patil touches feet of Sushilkumar Shinde in Solapur; राधाकृष्ण विखे पाटील सुशीलकुमार शिंदे यांच्या पाया पडले

सोलापूर :कुंभारी येथील मेडिकल कॉलेजच्या परिसरात सुरु होत असलेल्या श्रीमती कमलाबेन पटेल, नर्सिंग इन्स्टिट्यूटचं उद्घाटन सोमवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात सुशीलकुमार शिंदे व राधाकृष्ण विखे पाटील प्रमुख पाहुणे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ट्रस्टी बिपीनभाई पटेल यांनी सर्वांचं स्वागत करुन या नर्सिंग इन्स्टिट्यूटची माहिती दिली. याप्रसंगी माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, आ. प्रणिती शिंदे, माजी आमदार नर्सिंग मेंगजी, भाजपा अध्यक्ष विक्रम देशमुख, उद्योगपती दत्ता सुरवसे आदी उपस्थित होते.

विखे पाटील परिवाराचे शिंदेंकडून गुणगान

कार्यक्रमात सुशीलकुमार शिंदेंनी आपले मनोगत व्यक्त करताना विखे पाटील परिवाराचे गुणगान केले. राधाकृष्ण विखे पाटील हे बाळासाहेब विखे पाटील यांचे चिरंजीव आहेत. अतिशय हुशार व सौम्य आहेत, पण निर्णयामध्ये कणखर आहेत, असे राधाकृष्ण विखे पाटलांकडे बोट करून माजी केंद्रीय मंत्री शिंदेंनी कौतुक केले.

पवारांना दैवत मानणाऱ्या आमदाराने स्वतःच्या वडिलांना घराबाहेर काढलं?
बाळासाहेब विखे पाटील हे माझ्यासोबत युती सरकारमध्ये होते व महाराष्ट्रात देखील होते, राधाकृष्ण विखे पाटील हे देखील माझ्यासोबत राज्य सरकार मधील मंत्रिमंडळात होते, त्यांना अतिशय जवळून पाहिले आहे. त्यांनी प्रवरामध्ये मेडिकल कॉलेज चालवलं आहे. त्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुख्य भाग आहे अशा शब्दात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी विखे पाटील परिवाराचे कौतुक केले.

स्वतः शरद पवार ते विखे पाटील, विरोधी पक्ष नेत्यांचा राष्ट्रवादीचं टेन्शन वाढवणारा इतिहास

सुशीलकुमार शिंदेंना पाहताच विखे पाटलांनी पाय धरले

सोलापूर शहराजवळ असलेल्या ग्रामीण भागातील कुंभारी येथील मेडीकल कॉलेजच्या परिसरात श्रीमती कमलाबेन पटेल, नर्सिंग इन्स्टिट्यूटचं उद्घाटन सोमवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते झाले. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचताच महसूलमंत्री विखे पाटील यांचे स्वागत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी केले. यावेळी आदराने विखे पाटील यांनी सुशीलकुमार शिंदेंचे चरणस्पर्श करून अभिवादन केले. हे चित्र पाहून उपस्थित मान्यवर अचंबित झाले.

पाहा व्हिडिओ :

पृथ्वीबाबांसोबत नाईलाजाने काम, तर ठाकरेंसोबत… अजित पवारांचा गौप्यस्फोट

Source link

By jaghit