pune sex tantra camp cancelled, पुण्यात आयोजित होणारे ‘सेक्स तंत्र’ अखेर शिबिर रद्द; आयोजकांवर गुन्हा दाखल - pune sex tantra camp cancelled

[ad_1]

सोशल मीडियावर चर्चेत असलेले सेक्स तंत्र शिबिर वादंगामुळे रद्द करण्यात आले आहे. शिबिराला विरोध होऊ लागल्यानंतर उत्तर प्रदेशातील सत्यम शिवम सुंदरम फाउंडेशनने शिबिर रद्द करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला.

 

म. टा. प्रतिनिधी, पुणेः सोशल मीडियावर चर्चेत असलेले सेक्स तंत्र शिबिर वादंगामुळे रद्द करण्यात आले आहे. शिबिराला विरोध होऊ लागल्यानंतर उत्तर प्रदेशातील सत्यम शिवम सुंदरम फाउंडेशनने शिबिर रद्द करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. शिबिर रद्द करण्यात आल्याचे फाउंडेशनने पुणे पोलिसांना कळवले आहे. या प्रकरणी फाउंडेशचे संस्थापक रवी प्रकाश सिंग यांच्यावर सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेक्स तंत्र नावाने नवरात्र विशेष शिबिराची जाहिरात झळकल्याने सोशल मीडियात चर्चा सुरू झाली होती. १ ते ३ ऑक्टोबर दरम्यान लैंगिक प्रशिक्षण अभ्यासक्रम राबविला जाणार असल्याचे जाहिरातीत म्हटले होते. अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन नोंदणीसाठी एक क्रमांक देण्यात आला होता. अभ्यासक्रमासाठी पंधरा हजार रुपये शुल्क आकारण्यात येत होते. या शिबिराला सामाजिक आणि राजकीय संघटनांनी विरोध दर्शवल्यानंतर सायबर पोलिसांनी चौकशी सुरू केली होती. पोलिसांनी संस्थेचे प्रमुख सिंग यांच्याशी संपर्क साधला. या शिबिरासाठी नावनोंदणी झाली नसल्याने ठिकाण निश्चित झाले नव्हते. शिबिरात अश्लील काही नव्हते. चुकीच्या पद्धतीने चर्चा झाल्याने शिबिर रद्द करण्यात आल्याचे संस्थेच्या प्रमुखांनी सांगितल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांनी दिली.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

[ad_2]

Source link

By jaghit