Pune Ahmednagar Highway Accident, पुण्यात भीषण अपघात; पाच जणांचा जागेवर मृत्यू , तीन लहान मुलांचा समावेश - pune ahmednagar highway accident five people died on the spot including three children


पुणे: पुणे अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. यामध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू झालाय. विरुद्ध बाजूने आलेला ट्रक अचानक रोडच्या मध्ये आल्याने कारची धडक झाली आणि गाडीतील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात एकाजण गंभीर जखमी झाली आहे. या मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे.

बुधवारी रात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला असून कॅटेनर चालक उलट साईडने आल्याने हा भीषण अपघात झाला आहे. मृतांमध्ये तीन लहान मुलाचा देखील समावेश आहे.

वाचा- विधिमंडळात आजपासून खणाखणी; पावसाळी अधिवेशन ठरणार वादळी

अपघातामध्ये संजय भाऊसाहेब म्हस्के ( वय ५३), राम भाऊसाहेब म्हस्के ( वय ४५), राम राजू म्हस्के ( वय ७), हर्षदा राम म्हस्के ( वय ४ वर्ष), विशाल संजय म्हस्के ( वय १६ वर्ष) यांचा मृत्यू झाला असून साधना राम म्हस्के या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत .

रांजणगाव एमआयडीसीतील एल जी कंपनीसमोर हा भीषण अपघात झाला. मयत सर्व पनवेलला जाण्यासाठी निघाले होते. मात्र त्या अगोदरच काळाने त्यांच्यावर घाला घातला.Source link

By jaghit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: