२०१४ मध्ये राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकार चांगलं काम करत होते. परंतु सरकारवर टीका करत राष्ट्रवादी सत्ता आणि आघाडीपासून दूर झाली. त्यावेळी राष्ट्रवादीने जर हे सरकार पाडलं नसतं, तर पुन्हा आघाडीचंच सरकार सत्तेत आलं असतं. मात्र तसं न झाल्याचा भाजपला फायदा झाला. एकप्रकारे राज्यात भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार सत्तेत यायला कोण कारणीभूत आहे, हे सगळ्यांना समजलं, असं म्हणत पृथ्वीबाबांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लोकशाही मार्गाने पार पडल्यामुळे ‘जी २३’चा मुख्य हेतू सफल झाला. पण, निर्णयाला उशीर झाल्याने अनेक जण पक्ष सोडून गेल्याची खंत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.
हेही वाचा : गुलाबराव पाटलांनी रवी राणांना सुनावले खडे बोल, ‘कोणी विकाऊ नाही… शब्द मागे घ्या’
काँग्रेसमध्ये २२ वर्षांनंतर अंतर्गत निवडणुका झाल्या. आम्ही तशी मागणी लावून धरली नसती, तर कदाचित या निवडणुका आत्ताही झाल्या नसत्या, असं चव्हाण म्हणाले. पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे चांगलं काम करतील, असा विश्वास व्यक्त करत असतानाच हिमाचल प्रदेश, गुजरात निवडणुकांसह येत्या लोकसभेला काँग्रेस चांगले नियोजन करेल, अशी खात्री पृथ्वीराज चव्हाणांना वाटते.
हेही वाचा : मविआ नेत्यांची सुरक्षा हटवली, नार्वेकरांची सिक्युरिटी मात्र टाईट, शिंदे-फडणवीसांचा इरादा काय?