सुदैवाने या घटनेत अरिफा ही थोडक्यात बचावली आहे. आरिफा नेहमीप्रमाणे शाळेतून मामा सोबत घरी जात असताना रस्त्यातच तिला काचेचा मांजा लागल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
वाचाः रात्रभर यात्रेत फिरले, पहाटे घरी जायला निघाले पण वाटेत काळाने गाठले, दोन मित्रांचा मृत्यू
मात्र, वेळोवेळी पोलिसांकडून कारवाई होत असून देखील बंदी असलेला नायलॉन मांजा बाजारात येतोच कसा, असा प्रश्न आता या घटनेनंतर उपस्थित झाला आहे. वारंवार प्रशासनाकडून नायलॉन मांजा न वापरण्याचे आवाहन करण्यात आल्यानंतर देखील काही बेजबाबदार नागरिकांकडून मांजाची खरेदी केली जात आहे. त्यामुळे परिणामी त्याचा त्रास निष्पाप लोकांना भोगावा लागत आहे.
वाचाः पालकांची चिंता वाढवणारी बातमी, मुंबईत मुलांमध्ये वाढतोय ‘टीबी’चा धोका, ही काळजी घ्या
शहर पोलिसांनी संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी छापे टाकून घातक असा नायलॉन मांजा जप्त करून मांझ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तरी देखील अनेक ठिकाणी चोरीछुपे मार्गाने शहरात नायलॉन मांजाची विक्री होत आहे. एकीकडे संक्रांती निमित्ताने पतंगाचा उत्सव साजरा केला जात असताना दुसरीकडे नायलॉन मांज्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये देखील घबराटीचे वातावरण पसरले आहे.
वाचाः इथोपियाचा हायले लेमी मुंबई मॅरेथॉनचा विजेता, तर, भारतीयांमध्ये गोपी टीने जिंकली मॅरेथॉन