मिळालेल्या माहितीनुसार, जेवणातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही विषबाधा नेमकी कोणत्या कारणामुळे झाली याचा पोलीस तपास करत असल्याची समोर आली आहे. नालासोपारा पोलीस ठण्यात मंगळवारी दुपारीच्या सुमारास लॉकअपमध्ये असलेल्या आरोपींना शासनातर्फे देण्यात येणारे जेवण देण्यात आले. काही वेळानंतर यातील एका आरोपीला उलटी झाली व त्यांनतर उर्वरित ८ जणांनाही मळमळ व उलटीचा त्रास होऊ लागला.
लॉकआपमध्ये असलेल्या या आरोपींना मळमळ व उलटीचा त्रास होऊ लागल्याने रुग्णवाहिका बोलवून नालासोपारा पोलिसांनी या सर्वांना तात्काळ वसई- विरार महानगरपालिकेच्या सोपारा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या सर्व आरोग्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी सांगितले आहे.
दरम्यान, आरोपींनी खाल्लेल्या जेवणाचा नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. लॉकअपमध्ये असलेल्या या आरोपींना अचानक विषबाधा कशामुळे झाली याचे कारणही अद्याप स्पष्ट असून तपासणी अहवालानंतरच विषबबाधेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.