पोलिसांनी या अपघाता प्रकरणी चालकाला अटक केली आहे. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली. पहिल्यांदा कारनं राजलक्ष्मी यांना धडक दिली, त्यानंतर कार दुभाजकावर जाऊन आदळली. यामध्ये कारचं देखील मोठं नुकसान झालं आहे.
या अपघातात राजलक्ष्मी यांच्या डोक्याला मार लागल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. कारची धडक इतकी जोरात होती की राजलक्ष्मी राम कृष्णन धडकेनंतर हवेत उडाल्या आणि खाली पडल्या त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. राजलक्ष्मी राम कृष्णन यांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तिथं त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारचा चालक दारूच्या नशेत नव्हता. त्याचं कार वरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी तपास सुरू आहे. कारचालक देखील यामध्ये जखमी झाला असून त्याचं नाव सुमेर मर्चंट असं आहे. त्याचं वय 23 वर्ष असून तो ताडदेवचा रहिवासी आहे.
तुफान पाऊस, पंकजा मुंडे बरसत होत्या अन् लोकांनी खुर्च्या डोक्यावर घेऊन भाषण ऐकलं
या अपघातानंतर स्थानिकांनी कार चालकाला पकडलं आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. राजलक्ष्मी राम कृष्णन या एका टेक कंपनीच्या सीईओ म्हणून कार्यरत होत्या. पोलिसांनी कार चालकाच्या रक्ताचे नमुने घेतले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट होतील. बेदरकारपणे कार चालवण्याच्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक करण्यात आली असून दादरच्या सुट्टीच्या
कोर्टात हजर केलं जाईल. या प्रकरणी वरळी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
राजलक्ष्मी राम कृष्णन मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्या होत्या. मात्र, त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळं मॉर्निंग वॉक करताना सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.