इतकंच नाही तर राज्यासाठी पुढचे ४८ तास महत्त्वाचे असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. पुढच्या ४८ तासांत मुंबईसह इतर महत्त्वाच्या भागांमध्ये आणि घाटमाथावर मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे या भागांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसह उपनगर आणि आजूबाजूच्या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली.
आज म्हणजे ८ ऑक्टोबर रोजी मुंबईला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढच्या दोन-तीन दिवसांमध्ये राज्यभर ढगाळ वातावरण राहील तर ११ आणि १२ ऑक्टोबर रोजी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वरतवण्यात आली आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.