मुंबई : राज्यात धोधो बरसणाऱ्या पावसाने आता विश्रांती घेतल्याचं पाहायला मिळालं. मुंबई, ठाणे परिसरात तुरट ठिकाणी रिमझिम पाऊस झाला असला तरी राज्यभरात पावसाचा जोर कमी झाला आहे. हवामान खात्याकडून दिलेल्या माहितीनुसार, परतीच्या मान्सूनसाठी सध्या राज्यात पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे राज्यातून लवकरच पाऊस परतीच्या मार्गावर असेल.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मराठवाडा आणि विदर्भामध्ये आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये आता पावसानं परतीची वाट धरल्याचं पाहायला मिळते. अशात पाच ते दहा ऑक्टोबर दरम्यान मान्सून माघारी फिरणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
यामुळे सध्या राज्यात पावसाची शक्यता कमी आहे. मात्र, आज विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आल्यामुळे नागरिकांनाही सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.