Maharashtra Bhushan award ceremony Heat Stroke Sri Sadasya Death Appasaheb Dharmadhikari first reaction; ही माझ्या कुटुंबावर कोसळलेली आपत्ती, १३ श्री सदस्यांच्या निधनाने आप्पासाहेब धर्माधिकारी व्यथित

मुंबई :आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यासाठी खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर रविवारी आयोजित केलेल्या सोहळ्याला गालबोट लागलं. उष्माघातामुळे १३ श्रीसदस्यांना प्राण गमवावे लागले असून अनेक जणांवर उपचार सुरु आहेत. या कार्यक्रमाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. या दुर्घटनेविषयी महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या तर्फे पत्रक जारी करण्यात आले आहे.

काय म्हटलं आहे आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी?

महाराष्ट्र शासानाने आयोजित केलेल्या महाराष्ट्रभूषण पुरस्कार सोहळ्यासाठी खारघर येथे आलेल सारे श्री सदस्य हे माझ्या कुटुंबाचे सदस्य आहेत. श्री सदस्यांचा हा परिवार देशविदेशात पसरला आहे. या पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघाताने काही श्री सदस्यांना त्रास झाला आणि त्यातील काहींचा दुर्दैवाने मृत्यू झाला. ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेषदायक आहे. माझ्या कुटुंबातीलच सदस्यांवर कोसळलेली ही आपत्ती आहे. आपल्याच कुटुंबातील लोकांवर घाला येण्याच्या या घटनेने मी व्यथित आहे. माझे हे दुःख शब्दात व्यक्त करण्यापलिकडचे आहे. मृत्यू झालेल्या या सदस्यांच्या कुटुंबियांची आणि माझी वेदना सारखीच आहे. श्री सदस्य परिवाराची एकमेकांच्या सोबत राहण्याची पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे. त्यानुसार आम्ही सारे जण या आपदग्रस्तांसोबत कायम आहोत. यातील मृतांना सद्गती लाभो, तसेच त्यांच्या कुटुंबाला हा आघात सहन करण्याची शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. झाला प्रकार दुर्दैवीच होता त्याचे कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे.

परीक्षेसाठी निघाली, वाटेत ट्रेलरची धडक, कारचा चक्काचूर; खाकीतले देवदूत धावले अन् मग…

पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी खारघर येथे आले होते. आपल्या गुरुला सन्मानित होताना याचि देही याची डोळा पाहण्यासाठी तब्बल २० लाख श्री सदस्यांनी उपस्थिती लावल्याचे बोलले जाते.

जेवून घ्या रे, महाराष्ट्र भूषण सोहळ्यातून आईचा फोन; लेकरं शोधत राहिली, माऊली परतलीच नाही

Source link

By jaghit