हंचनाळ शिवारातील रसिका महाविद्यालयाच्या पाठीमागील रमेश बिरादार यांचं शेत आहे. शेतात पाण्याने भरलेली विहीर आहे. या विहिरीचं पाणी आणण्यासाठी देवणीतील चुलत भाऊ नरसिंग चव्हाण आणि संगमेश्वर चव्हाण हे दोघे भाऊ गेले होते. पाणी काढण्यासाठी नर्सिंग विहिरीत उतरला. मात्र, त्याचा तोल गेला अन् तो पाण्यात पडला.
हेही वाचा –रोज बाबा शाळेत सोडायचे, आज आईसोबत निघाली; माय-लेकीचा दुर्दैवी अंत…
पण, त्याला पोहता येत नसल्याने नरसिंग बुडू लागला. आपला भाऊ आपल्या डोळ्यादेखत बुडत असल्याचे पाहून संगमेश्वरने क्षणाचाही विलंब न करता बुडणाऱ्या भावाला वाचविण्यासाठी हात देण्याचा प्रयत्न केला. पण, या प्रयत्नात त्याचाही तोल गेला अन् तोही पाण्यात पडला. मात्र, दोघांनाही पोहता येत नव्हते. त्यातच काळाने डाव साधला अन् दोन्ही भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
हेही वाचा –संशयाने डोक्यात घर केलं, प्रेयसीचे न्यूड फोटो तिच्याच भावाला पाठवले, प्रियकराचा प्रताप…
या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय देवणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. त्यांच्यावर देवणी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. देवणी पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेश उस्तुर्गे करत आहेत. एकाच घरातील दोन तरुण भावंडांचा मृत्यू झाल्यामुळे चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हेही वाचा –पतीचा मृत्यू, पदरात तीन मुलं; लग्नात चपात्या बनवून मुलांना शिकवल, आता मुलगी थेट CID ऑफिसर झाली