नेमकं काय घडलं?
संदेश सुभाष कदम (वय ४० वर्ष, रा. माळवाशी कडुवाडी ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी) हा त्याच्या ताब्यातील हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटार सायकल (क्रमांक एम.एच.०८ बी.ए.५०२८) घेऊन देवरुख जवळ असलेल्या वाशी येथे गावी निघाला होता. पाठीमागे नरेंद्र गुणाजी पेंढारी (वय ५० वर्ष, रा. माळवाशी) बसले होते. पूर फाट्याच्या पुढील वळणावर दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास सुभाष कदम याच्या ताब्यातील मोटार सायकलवरील ताबा सुटला. त्यानंतर राँग साईडला जाऊन समोरुन येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक झाली.
यावेळी पांगरी दिशेकडुन देवरुख दिशेकडे येणारी मोटार सायकल क्रमांक एम.एच. १० बी. एच. ३५८१ या या दुचाकीला जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये संदेश कदम याचा जागीच मृत्यू झाला तर संदेशच्या मागे बसलेले नरेंद्र गुणाजी पेंडारी किरकोळ दुखापत होऊन जखमी झाले. तर समोरुन येणाऱ्या बाईकवरील दोघे प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. युवराज कल्लाप्पा खोत (वय-३२ वर्ष, रा. विटा कर्वे सांगली रोड, ता. विटा. जि. सांगली) तसेच अविनाश पांडुरंग जाधव (वय ३५ वर्ष, रा. मंगरुळ आळते रोड ता. विटा. जि. सांगली) हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.
महिला-पुरुषांसाठी एकच बाथरुम; भाड्याच्या घरात असलेलं पोलीस ठाणे अडचणीत, कर्मचारी हतबल
या सगळ्या अपघात प्रकरणाची नोंद देवरूख पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. देवरूख पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक विद्या पाटील या अपघात प्रकरणी अधिक तपास करत आहेत.