[ad_1]
Today Rashi Bhavishya, 4 September 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष (Aries Horoscope Today ):-
खर्चावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांकडून विचित्र अनुभव येऊ शकतो. आजचा दिवस चांगला जाईल. चांगले वाहन सौख्य लाभेल. घरातील टापटिपित मन रमून जाईल.
वृषभ (Taurus Horoscope Today ):-
लहान प्रवास घडू शकेल. हातातील कलेतून आनंद मिळेल. व्यवसायातील योजना लाभदायक ठरतील. मित्रांच्या मदतीने एखादे जुने काम पूर्ण होईल. हाती घेतलेली सर्व कामे पूर्ण होतील.
मिथुन (Gemini Horoscope Today ):-
कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. आवडीचे पदार्थ चाखायला मिळतील. बोलण्यातून सर्वांना आपलेसे कराल. जवळचे मित्र बर्याच दिवसांनी भेटतील. मेहनतीचे योग्य फळ मिळेल.
कर्क (Cancer Horoscope Today ):-
दिवस आपल्या मर्जीप्रमाणे घालवाल. स्वत:चे खरे करण्याकडे कल राहील. नवीन ओळखीचे मैत्रीत रूपांतर होईल. भावनेला आवर घालावी लागेल. आजचा दिवस लाभदायक ठरेल.
सिंह (Leo Horoscope Today ):-
निराश होणे टाळावे. एकदा पुढे टाकलेले पाऊल मागे घेऊ नका. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. मनात काहीशी चलबिचलता राहील. वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.
कन्या (Virgo Horoscope Today ):-
आज मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. अपेक्षित लाभाने आपण खुश राहाल. कामात स्त्रीवर्गाचा चांगला हातभार लागेल. बुद्धीवर्धक कामे हाताळाल. त्यामुळे बौद्धिक ताण जाणवू शकतो.
तूळ (Libra Horoscope Today ):-
जोडीदाराचा वरचष्मा राहील. अधिकारी वर्गाचा वेळोवेळी सल्ला घ्यावा. महत्त्वाच्या नोंदी करून ठेवाव्यात. केलेल्या कामातून कौतुकास पात्र व्हाल. घरातील कामात अधिक वेळ जाईल.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today ):-
आध्यात्मिक आवड पूर्ण कराल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. विशाल दृष्टीकोन ठेवून आपले मत मांडाल. तरुण वर्गाची कामात मदत मिळेल. मित्रांच्या ओळखीने काम होईल.
धनू (Sagittarius Horoscope Today ):-
अचानक धनलाभ होण्याची शक्यता. शेअर्स, जुगार यातून अपेक्षित लाभ मिळू शकेल. वडीलधार्यांचा आशीर्वाद मिळवाल. कमिशनच्या कामातून आर्थिक गरज भागवली जाईल. रागावर नियंत्रण ठेवा.
मकर (Capricorn Horoscope Today ):-
जोडीदाराच्या प्रेमळ स्वभावाचा पुन:प्रत्यय येईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. आजचा दिवस मनाप्रमाणे घालवाल. भागिदारीतून चांगला नफा मिळेल. संपर्कातील व्यक्तींशी मैत्री वाढेल.
कुंभ (Aquarius Horoscope Today ):-
आपल्या हातातील अधिकार लक्षात घ्यावेत. कोणतेही साहस करतांना सावध राहावे. केलेल्या कामाचा आनंद मिळेल. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल. जोडीदाराच्या कुशलतेचे कौतुक कराल.
मीन (Pisces Horoscope Today ):-
प्रेमात असलेल्या व्यक्तींना आज मनातील बोलता येईल. अति भावनाशील होऊ नका. जुगारातून अपेक्षित कमाई कराल. दिवस मनासारखा घालवाल. खेळकरपणे समोरील गोष्टी हाताळाल.
– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
[ad_2]
Source link