Today Rashi Bhavishya, 4 November 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष:-
बुद्धीला पटेल तोच निर्णय घ्या. संमिश्र घटनांचा दिवस. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. ओळखीच्या लोकांकडून फायदा होईल. दिवस चांगला जाईल.
वृषभ:-
आरोग्यात सुधारणा संभवते. मुलांच्या उत्कर्षाचा काळ. व्यापार्यांनी अधिक मेहनत घ्यावी. सरकारी कर्मचार्यांचे मतभेद होऊ शकतात. उगाचच वादात अडकू नका.
मिथुन:-
नवीन संधी दार ठोठावेल. उगाच स्वत:ला एखाद्या वादात अडकवू नका. लाभदायक दिवस. शेअर बाजारातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. जुगारातून लाभ संभवतो.
कर्क:-
अधिकाराचा अति वापर टाळावा. दिवसभर कामात गर्क राहाल. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. आत्ममग्न राहाल. वैचारिक दिशा बदलून पहावी.
सिंह:-
कौटुंबिक सौख्याचा समतोल राखावा. कलाक्षेत्राबाबत अपेक्षित वार्ता मिळतील. हित शत्रू त्रास देण्याचा प्रयत्न करतील. मनातील अनामिक भीती काढून टाकावी. अनोळखी व्यक्तींशी व्यवहार टाळावेत.
कन्या:-
कोणतीही गुंतवणूक सावधगिरीनेच करावी. आवक आणि जावक यांचा मेळ घालावा. वाहन चालवताना काळजी घ्यावी. रागावर नियंत्रण ठेवा. समोरील गोष्टीत आनंद शोधावा.
तूळ:-
इतरांना सल्ले द्यायला जाल. कामाची दिवसभर धांदल राहील. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक केले जाईल. एखादी घटना मन विचलीत करू शकते. इच्छा नसताना सुद्धा प्रवास करावा लागू शकतो.
वृश्चिक:-
लोकांवर अवलंबून राहू नका. पुढे ढकललेले काम हाती घ्या. मानसिक संतुलन राखावे. मनातील निराशाजनक विचार काढून टाकावेत. उगाचच लपवाछपवी करायला जाऊ नये.
धनू:-
दूरदृष्टी ठेवून विचार करावा. योग्य नियोजनावर भर द्यावा. शक्यतो आपल्या मुद्यावर ठाम रहा. कुटुंबातील सदस्यांची साथ लाभेल. व्यवहारात निष्काळजीपणा करू नका.
मकर:-
जोडीदाराच्या साथीने मनोकामना पूर्ण करा. व्यवसायात अति विश्वास ठेऊ नका. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. कामातील उत्साह वाढीस लागेल. दिवस धावपळीत जाईल.
कुंभ:-
फसवणुकीपासून सावध राहावे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. वडीलधार्यांचा योग्य तो मान राखावा. आवडीच्या वस्तु खरेदी कराल. मानसिक शांतता जपावी.
मीन:-
कामात मित्रांचा सल्ला घ्याल. अति मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. वैचारिक समतोल साधावा. उत्साहाने कामे हाती घ्यावीत. भडक विचार मांडू नका.
– ज्योतिषी विद्याधर करंदीकर