Astro new


Today Rashi Bhavishya, 21 October 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष (Aries Horoscope Today ):-

आपल्या मर्जीने दिवस घालवाल. दरवेळेस घाई उपयोगाची नाही. अती उत्साह दाखवू नका. निश्चयाने कामे हाती घ्या. कौटुंबिक गोष्टीत अधिक वेळ रमाल.

वृषभ (Taurus Horoscope Today ):-

आपल्या वर्तनावर कोणी संशय घेणार नाही याची काळजी घ्या. सावध भूमिका घ्या. वडीलांचे मोलाचे मार्गदर्शन घ्या. कौटुंबिक खर्च चिंतेत टाकू शकतो. मनाची चंचलता जाणवेल.

मिथुन (Gemini Horoscope Today ):-

मित्रांचे सल्ले तपासून घ्या. डोळे झाकून निर्णय घेऊ नका. नवीन कार्यात जोडीदाराचा सल्ला घ्यावा. कठोर मेहनतीला पर्याय नाही. कौटुंबिक सौख्यासाठी खर्च कराल.

कर्क (Cancer Horoscope Today ):-

आपली चूक मान्य करायला शिका. निष्काळजीपणा कमी करावा. जुन्या मित्रांची गाठ घ्याल. शेजार्‍यांची मदत मिळेल. नातेवाईकांशी संबंध सुधारतील.

सिंह (Leo Horoscope Today ):-

जोडीदाराच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. दिवस आनंदात जाईल. मित्रांसोबत फिरायला जाल. मुलांसोबत चांगला काळ व्यतीत कराल. कार्यालयातील कामे सकारात्मक परिणाम देतील.

कन्या (Virgo Horoscope Today ):-

लोकांशी बोलताना विचार पक्के ठेवा. आपले मुद्दे ठामपणे मांडा. आजचा दिवस मध्यम फलदायी. काही घटनांमुळे ताण वाढू शकतो. अस्थिरतेमुळे मन विचलीत होऊ शकते.

तूळ (Libra Horoscope Today ):-

बाहेरचे खाणे टाळावे. उगाच आजारांना निमंत्रण देऊ नका. मित्रांना मदत कराल. अपेक्षित यशासाठी मेहनत घ्यावी लागेल. बोलताना तारतम्य बाळगवे.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today ):-

लोकांना बोलण्यातून दिलासा द्यावा. कामाच्या ठिकाणी प्रशंसा केली जाईल. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यात वेळ जाईल. कर्ज मुक्तीसाठी प्रयत्न कराल. प्रेमातील व्यक्तींना नवीन ऊर्जा मिळेल.

धनू (Sagittarius Horoscope Today ):-

कामाचा उरक वाढवावा. मुलांकडून लाभ होतील. संमिश्र घटनांचा दिवस. परोपकाराची जाणीव ठेवाल. घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. वाहन खरेदी बाबत चर्चा कराल.

मकर (Capricorn Horoscope Today ):-

तुमचा निर्णय समोरची व्यक्ती मान्य करेल. घरातील कामात गुंग राहाल. मानसिक शांतता लाभेल. कौटुंबिक कामे प्राधान्याने पूर्ण कराल. मित्रांच्या मदतीने महत्त्वाची कामे पार पाडाल.

कुंभ (Aquarius Horoscope Today ):-

रोजच्या गोष्टी संभ्रमात पाडू शकतात. कार्यालयीन वातावरण चांगले राहील.  उत्साहाने कार्यरत राहाल. धार्मिक गोष्टीत आनंद मिळेल. अधिकार्‍यांच्या सहकार्याने समस्या दूर होईल.

मीन (Pisces Horoscope Today ):-

व्यवसायात चलती झालेली दिसून येईल. आहाराची पथ्ये पाळावीत. कौटुंबिक कामात हिरीरीने भाग घ्याल. जोडीदाराशी मतभेद संभवतात. दिवसाची सुरुवात कंटाळवाणी असू शकते.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Source link

By jaghit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: