Astro-new

[ad_1]

Today Rashi Bhavishya, 14 September 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष (Aries Horoscope Today ):-

घरात उत्साहाचे वातावरण राहील. आवश्यक तेथेच बढाया मारा. भौतिक विकास होईल. एखादा नवीन करार होण्याची शक्यता. आरोग्यात सुधारणा होईल.

वृषभ (Taurus Horoscope Today ):-

कौटुंबिक खर्च वाढेल. घरात मानाची वागणूक मिळेल. कामातील नवीन योजनांवर भर द्यावा. कुटुंबासमवेत वेळ चांगला जाईल. मनोकामना पूर्णत्वास जाण्याचे योग.

मिथुन (Gemini Horoscope Today ):-

आपले मानसिक आरोग्य स्वस्थ ठेवा. करमणुकीच्या साधनात जास्त वेळ घालवाल. घरातील ज्येष्ठ मंडळींशी चर्चा कराल. मानसिक शांतता व समाधान लाभेल. एखादे काम पूर्ण दिवस घेईल.

कर्क (Cancer Horoscope Today ):-

अति धाडसाने कोणताही निर्णय घेऊ नका. आपल्या बोलण्यात स्पष्टता ठेवाल. सृजनात्मक कार्यातील आवड वाढेल. हातातील कामात यश येईल. सहकारी संपूर्ण सहकार्य करतील.

सिंह (Leo Horoscope Today ):-

समोरच्या व्यक्तीच्या मतांचा आदर करावा. मुलांबरोबर वेळ आनंदात जाईल. दिनक्रम व्यस्त राहील. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. वरिष्ठ अधिकार्‍यांशी जुळवून घ्यावे लागेल.

कन्या (Virgo Horoscope Today ):-

अनाठायी खर्चाला बळी पडू नका. कामातील नवीन संधी शोधाव्यात. व्यावहारिक सावधानता बाळगावी. वाणी संयमित असावी. प्रेमातील व्यक्तींना नवीन उत्साह लाभेल.

तूळ (Libra Horoscope Today ):-

सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. जोडीदाराशी अति वाद टाळावा. आजचा दिवस लाभदायक. नवीन प्रकल्प हाती घेऊ शकता. एखादा जुना वाद संपुष्टात येईल.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today ):-

तुमची मते इतरांना मान्य होतील. अति तिखट पदार्थ टाळा. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. नोकरदार वर्गाला दिलासादायक  बातमी मिळेल.

धनू (Sagittarius Horoscope Today ):-

गूढ गोष्टींचे वाचन कराल. तुमचा सल्ला लोक ऐकतील. कामात जोखीम पत्करावी लागेल. नेहमीच्या कामात काहीसा बदल करून पाहावा. नवीन संधी हेरता आली पाहिजे.

मकर (Capricorn Horoscope Today ):-

अति जड पदार्थ खाऊ नयेत. विनाकारण पैसे खर्च होतील. घरातील कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. एकाच वेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका.

कुंभ (Aquarius Horoscope Today ):-

विद्यार्थांच्या इच्छा पूर्ण होतील. जोडीदाराचे मत शांतपणे ऐकावे. संमिश्र घटनांचा दिवस. आहारावर नियंत्रण ठेवावे. कामे उरकण्याची घाई कराल.

मीन (Pisces Horoscope Today ):-

घरात नवीन वस्तूंची खरेदी कराल. जुने परिचित लोक भेटतील. व्यापारी वर्गाला सुखकारक दिवस. सामाजिक स्तरावर मान वाढेल. संयमाने समोरील समस्येचे निराकरण करू शकाल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर



[ad_2]

Source link

By jaghit