Today Rashi Bhavishya, 14 November 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष:-
उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. एकमेकातील एकोपा वाढीस लागेल. कलात्मक दृष्टीकोन वाढीस लागेल. आपले संपर्क क्षेत्र वाढेल. चारचौघात कौतुकास पात्र व्हाल.
वृषभ:-
कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. सहकारी वर्गाशी सलोखा वाढेल. हाताखालील लोक विश्वासू मिळतील. मात्र काही संधी मिळण्यासाठी वाट पहावी लागेल. लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे.
मिथुन:-
प्रेम सौख्यात वाढ होईल. गायन कलेला योग्य दाद मिळेल. आवडते छंद जोपासले जातील. करमणुकीत अधिक काळ रमाल. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील.
कर्क:-
घरगुती वातावरण प्रसन्न राहील. जोडीदाराशी क्षुल्लक मतभेद संभवतात. मानसिक चलबिचलता जाणवेल. काही गोष्टी आपल्याला विस्मित करतील. घरासाठी नवीन वस्तु खरेदी कराल.
सिंह:-
नातलगांशी जवळीक वाढेल. प्रवासाची हौस भागवता येईल. चांगली कल्पनाशक्ती वाढीस लागेल. हातून एखादे सत्कार्य घडेल. हस्त कलेचे कौतुक केले जाईल.
कन्या:-
आपली इतरांवर छाप पडेल. गोड वाणीने सर्वांना आपलेसे कराल. आर्थिक बाजू सुधारेल. जोडीदाराचे प्रेमळ सौख्य लाभेल. मौल्यवान वस्तु खरेदी कराल.
तूळ:-
सर्वांशी मिळूनमिसळून वागाल. प्रत्येक गोष्टीकडे आनंदी दृष्टीकोनातून पहाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. आपल्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल.
वृश्चिक:-
काही बाबीत पिछेहाट झाल्यासारखे वाटू शकते. आपली जिद्द वी चिकाटी कायम ठेवावी लागेल. क्षुल्लक अडथळ्यातून मार्ग काढावा लागेल. मानापमानाच्या प्रसंगांकडे दुर्लक्ष करावे. सूर्याची उपासना करावी.
धनू:-
हातातील कामात यश येईल. मनोकामना पूर्ण होईल. आर्थिक गणिते आपल्या मनाप्रमाणे घडून येतील. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. प्रगतीच्या दृष्टीने पाऊल उचलावे.
मकर:-
मनातील निराशाजनक विचार दूर सारावेत. जुन्या गोष्टी आठवून खट्टू होऊ नका. मानसिक सौख्याला प्राधान्य द्यावे. आर्थिक बाजू सुधारेल. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष घालू नका.
कुंभ:-
इतरांना स्वखुशीने मदत कराल. परोपकारी वृत्तीत वाढ होईल. चांगली संगत लाभेल. ऐषारामाच्या साधनांची खरेदी कराल. शक्यतो कोणत्याही वादात अडकू नका.
मीन:-
मानसिक चंचलता जाणवेल. काही गोष्टी दुर्लक्षित कराव्या लागतील. चांगला धनलाभ संभवतो. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. हातातील कामात यश येईल.
– ज्योतिषी विद्याधर करंदीकर