Astro-new


Today Rashi Bhavishya, 05 October 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष (Aries Horoscope Today ):-

जोडीदाराच्या सहकार्याने काम पूर्ण कराल. घरातील मोठ्या कामाला गती येईल. मुलांची कृती मनाला लागू शकते. इच्छा नसताना एखादे काम करावे लागेल. मन विचलीत होऊ शकते.

वृषभ (Taurus Horoscope Today ):-

विकतची दुखणी घेऊ नका. विचार करून निर्णय घ्या. वरिष्ठ अधिकार्‍यांचे सहकार्य लाभेल. उगाच नसते विचार करू नका. ज्येष्ठांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल.

मिथुन (Gemini Horoscope Today ):-

इतरांचा विश्वास संपादन करावा. दिवसाची सुरुवात उत्तम होईल. प्रयत्नात कसूर करू नका. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवेल. सावधगिरी बाळगून कामे करावीत.

कर्क (Cancer Horoscope Today ):-

छानशौकीपणावर खर्च कराल. खर्चावर ताबा ठेवावा. संयम आणि धिराने परिस्थिती हाताळा. दिवसाची सुरुवात मध्यम फलदायी असेल. आरोग्याची काळजी घ्यावी.

सिंह (Leo Horoscope Today ):-

लोकांना योग्य सल्ला द्याल. जबाबदारीने काम कराल. उद्योगाची स्थिती सुधारेल. वरिष्ठ अधिकार्‍यांचा पाठिंबा मिळेल. हितशत्रू माघार घेतील.

कन्या (Virgo Horoscope Today ):-

आक्रमकतेने बोलू नका. व्यापारी क्षेत्रात प्रगती कराल. आपल्या स्वभावाचा लोक गैरफायदा घेऊ शकतात. मदतीचा हात पुढे कराल. मित्रांचे सहकार्य लाभेल.

तूळ (Libra Horoscope Today ):-

भागीदारीत सबुरीने घ्यावे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको. स्पर्धा परीक्षेची तयारी कराल. हिशोबात चोख राहाल. अनेक दिवस वाट पाहत असलेल्या व्यक्तीची गाठ पडेल.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today ):-

जास्त मसालेदार पदार्थ खाऊ नका. मित्रांचा सल्ला ऐकावा. मेहनतीचे कौतुक केले जाईल. कामावर लक्ष केन्द्रित करणे गरजेचे. एकूणच आजचा दिवस संमिश्र राहील.

धनू (Sagittarius Horoscope Today ):-

रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. मनातील अनामिक भीती दूर होईल. दुपारनंतर धावपळ करावी लागेल. नवीन ओळख मैत्रीत बदलेल. वाहन चालवताना काळजी घ्यावी.

मकर (Capricorn Horoscope Today ):-

विचारांना चांगली दिशा द्याल. मनात नवीन कल्पना रुजतील. कामे विलंबाने सुरू करू नका. चिकाटी व संयम कायम ठेवा. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

कुंभ (Aquarius Horoscope Today ):-

मनातील संभ्रम दूर करावा. जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवाल. पित्त प्रकृतीत वाढ होऊ शकते. अधिकारी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळू शकते.

मीन (Pisces Horoscope Today ):-

कौटुंबिक समतोल साधावा. भागीदारीच्या कामात अधिक वेळ द्यावा. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. जुने कामे आधी पूर्णत्वास न्या. मन विचलीत होणार नाही याची दक्षता घ्या.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Source link

By jaghit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: