Guru Jupiter Planet Margi 2022


गुरु ग्रह हा सध्या वक्री अवस्थेत आहे. तो २४ नोव्हेंबरनंतर मार्गी होणार आहे. याचा सर्व राशींच्या लोकांवर परिणाम होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार २४ नोव्हेंबरला सकाळी ४ वाजून ३६ मिनिटांनी गुरु ग्रह मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. गुरुदेवांच्या या अवस्थेमुळे अनेक राशींच्या लोकांना फायदा होण्याची शक्यता आहे, तर काहींना नुकसान होऊ शकते. गुरु ग्रहाच्या या राशी परिवर्तनाचा कोणत्या राशीवर काय परिणाम होईल ते जाणून घेऊया.

गुरु हा ग्रह मिथुन राशीच्या सातव्या आणि दहाव्या घराचा स्वामी आहे. २४ तारखेला गुरुदेव मीन राशीत मार्गी झाल्यानंतर या राशीच्या लोकांच्या व्यावसायिक जीवनात काही अडचणी येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी वातावरण प्रतिकूल असू शकते, तसेच यावेळी तुम्हाला कामाचा ताण येऊ शकतो. इतकंच नाही, तर खर्च वाढल्यामुळे तुम्हाला आर्थिक समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते.

सिंह राशीच्या पाचव्या आणि आठव्या घराचा स्वामी गुरु ग्रह आहे. गुरु मीन राशीत मार्गी झाल्यानंतर तुमच्यावरील कामाचा भार वाढू शकतो. तसेच, व्ययसायात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आरोग्याच्या संबंधित तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. त्याचबरोबर या काळात तुमचे आर्थिक गणितही बिघडण्याची शक्यता आहे.

१६ ऑक्टोबरनंतर ‘या’ राशींच्या चिंतेत भर पडण्याची शक्यता; मंगळाच्या ‘महादरिद्र’ योगामुळे अडचणीत होणार वाढ

गुरु हा तूळ राशीच्या सहाव्या घराचा स्वामी आहे. या काळात या राशीच्या लोकांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच खर्चात वाढ होऊन व्यवसायातही हानी होण्याची संभावना आहे. या काळात वैयक्तिक जीवनाबाबत सावध राहण्याची गरज आहे.

वृश्चिक राशीच्या दुसऱ्या आणि पाचव्या घराचा स्वामी गुरु ग्रह आहे. त्यामुळे या काळात या राशीच्या लोकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात. प्रमोशन किंवा पगारवाढही होऊ शकते. तसेच व्यवसायात लाभ होण्याच्या शक्यता आहे.

कन्या राशीच्या लोकांना या काळात लाभ होण्याची संभावना आहे. यावेळी नोकरदारांना नवीन संधी मिळू शकतात. व्यवसायातही फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर इतर अनेक माध्यमातून पैसे मिळण्याची शक्यता आहे.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

Source link

By jaghit