gondiya railway accident, मोठी बातमी : गोंदियाजवळ रेल्वे गाडीला भीषण अपघात; ५० पेक्षा अधिक प्रवासी जखमी - big news : railway train accident near gondia; more than 50 passengers injured


गोंदिया : रायपूरकडून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या ‘भगत की कोठी’ या रेल्वे गाडीला गोंदिया शहराजवळ अपघात झाला आहे. पुढे जात असलेल्या मालगाडीला ‘भगत की कोठी’ या रेल्वे गाडीने धडक दिल्याने हा अपघात झाला असून अपघातात ५० पेक्षा अधिक प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.

मालगाडीला धडक दिल्यानंतर ‘भगत की कोठी’ या रेल्वे गाडीचा एक डब्बा रुळाखाली घसरला. ही घटना आज पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली आहे. रेल्वे गाडीने अचानक दिलेल्या धडकेनंतर प्रवासी जखमी झाले असून जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालय व तसंच खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.Source link

By jaghit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: