Diwali Padwa 2022: ‘साडेतीन मुहूर्त’ म्हणजे काय? हे दिवस नेमके कोणते? ‘अर्धा मुहूर्त’ दिवाळी पाडव्याचा की अक्षय्य तृतीयेचा? | balipratipada 2022 what does sade tin muhurat means which is half muhurta is it diwali padwa or akshaya tritiya scsg 91


balipratipada 2022 what does sade tin muhurat means: आज बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडव्याचा दिवस. दिवाळी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त असल्याचं मानलं जातं. मात्र साडेतीन मुहूर्त म्हणजे नेमकं काय? दिवाळी पाडव्याला अर्धा मुहूर्त का मानतात? इतर तीन मुहूर्त कोणते? या साडेतीन मुहूर्तांमधील नेमकं कारण काय? हे आणि असे अनेक प्रश्न साडेतीन मुहूर्त हे ऐकल्यावर पडतात. याच साऱ्या प्रश्नांना पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सविस्तर उत्तरं दिली असून अनेक शंकांचं निसरसन केलेलं आहे.

नक्की वाचा >> Diwali Padwa Bhaubeej: पत्नीने पाडव्याचं पूजन आधी करावं की बहिणीने भाऊबीजेचं? 

आधी आजच्या दिवसाचं महत्त्व काय आहे ते जाणून घेऊयात…
आज कार्तिक शुक्ल प्रतिपदा, दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदा, अभ्यंगस्नान, गोवर्धन पूजन, वहीपूजन, अन्नकूट, आनंदनाम विक्रम संवत् २०७९, महावीर जैन संवत् २५४९ , यमद्वितीया, भाऊबीज आहे. विक्रम संवत् २०७९ या नूतन वर्षाचा प्रारंभ होत आहे. महाराष्ट्रात चैत्र शुक्ल प्रतिपदेला शालिवाहन शक वर्षांचा प्रारंभ होतो त्यादिवशी आपण नवीन वर्षारंभ साजरा करीत असतो. त्या दिवसाला आपण ‘चैत्री पाडवा ‘ असे म्हणतो. गुजरात आणि उत्तर भारतात विक्रम संवत् पाळला जातो, अशी माहिती दा. कृ. सोमण यांनी दिली.

संवत् म्हणजे काय?
कार्तिक शुक्ल प्रतिपदा हा विक्रम संवत् वर्षाचा पहिला दिवस असतो, या दिवसाला ‘दिवाळी पाडवा‘ म्हणून ओळखले जाते. आज विक्रम संवत् २०७९ चा प्रारंभ होत आहे. या नूतन विक्रम संवत्सराचे नाव ‘आनंद’ असे आहे. विक्रम संवत् हा उज्जयिनीस विक्रमादित्य राजाने सुरू केला. शालिवाहनाच्या शकामध्ये १३५ मिळवले की विक्रम संवताचे वर्ष येते, असं दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.

बलिप्रतिपदेचं महत्त्व काय?
आज बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा. कार्तिक शुक्ल प्रतिपदा सूर्योदयी असेल त्या दिवशी बलिप्रतिपदा साजरी करावी असं दा. कृ. सोमण सांगतात. बलिप्रतिपदा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक दिवस मानला जातो. व्यापारी लोक शुभ चौघडी वेळ पाहून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुजलेल्या नवीन वह्यांवर बलिप्रतिपदेपासून हिशेब लिहिण्यास प्रारंभ करतात.

बलिप्रतिपदा हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे का?
या प्रश्नाला उत्तर देताना दा. कृ. सोमण यांनी, “साडेतीन मुहूर्तात काही लोक अक्षय्य तृतीया अर्धा समजतात तर काही लोक बलिप्रतिपदा अर्धा समजतात,” असं सांगितलं. तसेच, “मला विचाराल तर अक्षय्य तृतीया अर्धा असतो बलिप्रतिपदा पूर्ण मूहूर्त असतो,” असंही दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. आज विक्रम संवत् २०७९ चा प्रारंभ होत आहे. नवीन वर्षाचा आरंभ होतो त्याप्रमाणे हा दिवस महत्त्वाचा आहे असं दा. कृ. सोमण यांनी सूचित केलं.

अर्ध्या मुहूर्तामागील संकल्पना काय?
अर्धा मुहूर्त नेमका कोणता? असं विचारलं असता दा. कृ. सोमण यांनी खरं तर कोणताच मुहूर्त अर्धा नसतो, असं सांगितलं. पूर्वी पाऊणकी, निमकी, दीडकी मोजायचे त्याचप्रमाणे औटकीही मोजायचे. एक औट म्हणजे साडेतीन. याचसंदर्भातूनहे साडेतीन मुहूर्त आले. हे फक्त नावापुरते साडेतीन आहेत. मात्र हे चारही दिवस हे शुभ असतात, असंही दा. कृ. सोमण यांनी म्हटलं आहे.

याट औटच्या संकल्पनेमधून साडेतीन शक्तीपीठांसारख्या संकल्पना समोर आल्याचा संदर्भही दा. कृ. सोमण यांनी दिला. केवळ म्हणायला साडेतीन मुहूर्त म्हणतात. मात्र हिंदू वर्षामधील चारही दिवस शुभ अशतात. आपल्या हातून शुभ कार्य व्हावं, हातून चांगल्या कामाचं उद्घाटन व्हावं असा कायमच विचार असतो. त्याचासाठी वर्षातले काही ठराविक चार दिवस शुभ मानले जाण्याची पद्धत आहे, असं दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.

साडेतीन मुहूर्त कोणते?
दा. कृ. सोमण यांच्या सांगण्यानुसार हे मुहूर्त जरी सांगण्यासाठी साडेतीन गृहित धरले तरी ते एकूण चार दिवस आहेत. हे चार दिवस खालीलप्रमाणे –

गुढीपाडवा
अक्षय्य तृतीया
दसरा
दिवाळी पाडवा

या चारपैकी काहीजण अक्षय्य तृतीयेला अर्धा मुहूर्त मानतात तर काहीजण दिवाळी पाडव्याला अर्धा मुहूर्त मानतात. दा. कृ. सोमण यांच्या मते दिवाळी पाडव्याला नवीन संवत् सुरु होत असल्याने त्याला पूर्ण मुहूर्त मानून अक्षय्य तृतीयेला अर्धा मुहूर्त माननं योग्य ठरतं.

Source link