पाठीवर वार करून मला विरोधी पक्षाच बसवलं- आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे यांच्या संवाद यात्रेचा आज दुसरा दिवस आहे. नाशिकच्या चांदोरी येथे आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. पाठीवर वार करुन मला विरोधी पक्षात बसवलं. वरळीतून लढणं जमत नव्हतं तर मला फोन करुन सांगायचं, मी ठाण्यात येऊन लढलो असतो, असा टोला आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
क्लिक करा आणि वाचा- विषारी साप गळ्यात लटकवून स्टंटबाजी, फण्याला हात लावणे पडले महागात, घडायला नको तेच घडले
मला मोठ्या सभा घ्यायच्या नाहीत, मला अशाच छोट्या सभा घ्यायच्या आहेत. मोठ्या सभा घेतल्या तर नागरिकांच्या जवळ जाता येत नाही. बुरा वक्त आया है, वो भी जायेगा. गद्दार आणि मुख्यमंत्री सभा घेतात तेव्हा खोके वाटले जातात, पण तरीही खुर्च्या रिकाम्या असतात. पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा आपल्याकडे होते तिकडे पण होते. ही घोषणा क्सिली तरी मी इथेच आहे. पण ते गद्दार पळून जातात किंवा घोषणा देणाऱ्याला पोलीस पकडतात.
क्लिक करा आणि वाचा- काँग्रेसला सोयीनुसार वापरण्यापेक्षा…; पक्षांतर्गत संघर्षाने व्यथित थोरातांना विखेंनी डिवचले, केला थेट सवाल
महाराष्ट्रात एवढं घाणेरडं राजकारण कधीच झालं नव्हतं- आदित्य ठाकरे
दुःख याचं नाही की उद्योग बाहेर गेले; पण राजकीय अस्थिरतेमुळे रोजगार येत नाहीत. कधीही एवढं घाणेरडं राजकारण महाराष्ट्रात नव्हतं, अशी खंत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. माझ्याकडे देण्यासारखं काही नाही. मी तुमच्याकडून घ्यायला आलेलो आहे. आशीर्वाद तुम्ही मला द्या. गलिच्छ राजकारण सुरू आहे. हे राजकारण बदलायचं आहे. जेव्हा तुम्ही मला भेटता, बोलता तेव्हा वाटतं की महाराष्ट्राला सुवर्णकाळ येईल; पण महाराष्ट्राचा सुवर्णकाळ हरवला आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- VIDEO : डोकंच चक्रावतं! चक्क उंदराने चोरला महागडा हिऱ्याचा हार, पाहा कशी केली चोरी