गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला पाटण्याला नेण्याऐवजी घरच्यांनी त्याला आरा शहरातील बाबू बाजार येथील खाजगी रुग्णालयात नेले. जेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर, दोन जखमींवर आरा सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मृतकाचं नाव धनी यादव आहे. तर या घटनेत एक १६ वर्षीय मुलगा आणि मृताचा चुलत भाऊ गोळीबारात जखमी झाले आहेत.
मृताच्या चुलत भावाने सांगितले की, सोमवारी रात्री सर्वजण होलिका दहनासाठी जात होते. तेव्हा आरोपी पक्षातील काही मुलं सर्व लोकांवर शेण फेकत होती. काही लोकांनी त्यांना यासाठी रागावलं. यावरून त्यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर आरोपींनी शिवीगाळ आणि गोळीबार सुरू केला. त्यामुळे गावकरी जमा झाले. सोमवारी रात्री हा वाद निवळला असं सर्वांना वाटलं.
त्यानंतर मंगळवारी सकाळी हे सर्वजण दारात बसले होते. तेव्हाच आरोपी पक्षाचे लोक हातात शस्त्रं घेऊन तिथे आले आणि त्यांनी ताबडतोड गोळीबार सुरू केला. या गोळीबारात धनी यादव आणि रवी रंजन कुमार यांना गोळी लागली. या गोळीबारात चिंता देवी आणि त्यांचा भाचा चंद्रशेखर कुमार हे देखील जखमी झाले आहेत.
मृतकाचा चुलत भाऊ रणजीत यादव याने गावातील अमरुधी आणि बाबुआ यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप केला आहे. मात्र, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दुसरीकडे, घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस ठाण्याने आरा सदर रुग्णालय गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण आहे.