लोणार नजीकच्या शिवार जंगलात गळफास घेऊन विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना १९ जानेवारीला उघडकीस आली. त्यापूर्वी तो १८ जानेवारीपासून बेपत्ता होता. लोणार येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तो शिकत होता अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. कैलास समाधान गायकवाड असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याने नेमक्या कोणत्या कारणावरून आत्महत्या केली, ही बाब स्पष्ट झाली नाही.
लोणार येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये तो शिकत होता. तसेच समाज कल्याणच्या वसतिगृहामध्ये तो राहत होता. अशी ही माहिती समोर आली आहे. या प्रकरणी प्राथमिक माहितीच्या आधारावर आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत तरुणाचे वडील समाधान गुलाबराव गायकवाड यांनी दिलेला तक्रारीवरून ही नोंद करण्यात आल्याची माहिती ठाणेदार विजयसिंह राजपूत यांनी दिली आहे.
हेही वाचा : हसतमुख गुरुजींची डोळ्यात पाणी आणणारी एक्झिट, ट्रकखाली चिरडून मुख्याध्यापकांचा अंत
एकंदरीत एका युवा विद्यार्थ्याने आपली जीवनयात्रा का संपवली यामागे तर्कवितर्क लावले जात आहेत, तर परिसरात कैलासच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेला एक कुशल कामगार तरुण वयात निघून गेला. प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून त्याने पाहिलेलं स्वप्न आता अधुरंच राहिले, असे म्हणावे लागेल.
हेही वाचा : लघुशंका करताना हटकलं, तरुणासोबत बाचाबाची, बेपत्ता वृद्धाच्या मृत्यूचं गूढ सहा दिवसांनी उलगडलं