budhwar peth pune, कडक सॅल्युट! पुण्यात बुधवार पेठेतील सेक्स वर्कर्सचं आयुष्य बदलवणारी महिला; वाचून तुम्हीही कराल कौतुक - mata super women budhwar peth sex workers pune alka gujnal social worker

पुणे : गजबजलेलं धावतं शहर, ज्या शहराला देशातलं सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल जातं, जिथे विद्याचं माहेर घर आहे ते म्हणजे पुणे. पुण्यामध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या रोज वाढत चालली आहे. शिक्षण घेण्यासाठी आणि आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी नागरिक पुण्याला प्राधान्य देतात. पुणे शहर पेठाचं शहर म्हणून ओळखलं आहे. सोमवार पेठ, रविवार पेठ, नाना पेठ, सदाशिव पेठ या पेठामध्ये असलेलं एक पेठ म्हणजे बुधवार पेठ. शहरातल्या मुख्य भागात असलेलं हे बुधवार पेठ शहरातल्या दुसऱ्या बाजूचा आरसा आहे. बुधवार पेठ हा पुण्यातला रेड लाइट परिसर आहे.

वाढत्या शहरामध्ये बुधवार पेठेत भेट देणाऱ्या लोकांची संख्या ही वाढत चालली आहे. आपली शारीरिक संभोगाची भूक मिटवण्यासाठी अनेक शहरातून लोक बुधवार पेठेत येत असतात. मात्र आपली गरज भागल्यानंतर आपण त्या ठिकाणावरून निघून जातो आणि तिथे काम करणाऱ्या महिला आणखी एक दुसरा ग्राहक शोधण्यासाठी रस्त्यावर उभ्या राहतात. हे दररोजचं असतं. कोणीही कधी त्या महिलांच्या बाबत विचार करत नाही. या महिला दुसऱ्या राज्यांतून पुण्यात वेश्या व्यवसाय करण्यसाठी येत असल्याने त्यांचं कोणीही या ठिकाणी ओळखीचं नसतं. H1 N1 सारखा गंभीर आजर होऊन त्यांचं निधन झालं, तरी त्यांचा अंत्यविधी करणसाठी कोणीही उपस्थित नसतं. तसंच या महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. मात्र त्यांना मदत कोणाची नसते. त्यांच्या समस्यांची जाणीव करून घेत अल्का गुजनाल अशा महिलांसाठी देवदूत ठरल्या आहेत.

या महिलांच्या समस्या जाणून घेत असताना अल्का गुजनाल याना समजलं, की ब्रोथल बेसमध्ये काम करताना आरोग्यच नाही, तर अनेक बाबींना तोंड द्यावं लागतं. वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला या इतर राज्यातून आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी येत असतात. इथे आल्यानंतर त्यांचं कोणीही ओळखीचं नसतं. परिणामी त्यांना इथल्या सोया सुविधांबाबत माहिती नसते. म्हणजेच त्यांचं रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड हे मुख्य डॉक्युमेंट इतर राज्यातले असल्याने राज्यातल्या बेसिक योजनेचा लाभ घेण्यास महिला वंचित राहतात. असे अनेक प्रश्न अल्का गुजनाल यांनी जाणून घेतले.

हेही वाचा –
अपघातात नवरा दृष्टीहीन, बड्या पगाराची नोकरी सुटली; हार न मानता मसाल्याचा व्यवसाय केला, २५ माणसांना नोकरी दिली!

अल्का गुजनाल यांनी सुरवातीला ब्रोथल बेसमध्ये काम करणाऱ्या महिलांचा अंत्यविधी करण्यास सुरवात केली. ज्या महिला रेड लाइट एरियामध्ये काम करतात त्यांना कोणता आजार झाला आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला, तर त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी कोणताही व्यक्ती पुढे येत नाही. त्या महिलेचा नवरा, आई-वडील असे कोणीही नातेवाईक पुढे येत नाही. अश्या बेवारस महिलांसाठी त्यांचा अंत्यविधी करायला अल्का गुजनाल यांनी सुरवात केली. एवढंच नाही, तर महिला ज्या जातीची आहे, त्याप्रमाणे तिचा अंत्यविधी करण्याचं काम अल्का गुजनाल यांनी स्वखर्चाने करण्यास सुरुवात केली. त्यांचं हे काम करताना इथे काम करणाऱ्या अनेक महिलांनी आपल्या समस्या त्यांना सांगितल्या.

हे करत असताना महिलांना त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण आणि भविष्य प्राप्त होण्यासाठी अल्का गुजनाल त्यांचं काउंसलिंग करतात. तिथे काम करणाऱ्या महिला अनेक व्यसनात अडकल्या असून त्यांना जागरुक करुन अशा प्रकारचं व्यसन हे तुमच्यासाठी किती हानिकारक असू शकतं, तुमच्या मुलांसाठी किती धोकादायक असू शकतं हे सांगितलं जातं. अलका गुजनाल पुणे महानगरपालिकेमार्फत दर महिन्याला बुधवार पेठेत आरोग्य शिबिर न चुकता घेतात.

हेही वाचा – #MataSuperWoman: रस्त्यांवर फिरणाऱ्या महिलांसाठी देवदूत ठरतायेत भाग्यश्री, मनोरुग्णांसाठी १५ वर्षांपासून सुरू आहे अविरत सेवा

इथे काम करत असताना स्वच्छता राखणं त्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं ठरतं. मात्र बुधवार पेठेत ड्रेनेज तसंच इतर दुर्गंधीने तिथे काम करणाऱ्या महिलांना अनेक रोगांना आणि आजारांना समोर जावं लागतं. यासाठी देखील सातत्याने जनजागृती करून बुधवार पेठेतला काही परिसर यांनी स्वच्छ राखला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेशन कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदार कार्ड हे सगळं काढून देण्याचं काम किंवा हे कसं आणि कुठे काढता येईल याची माहितीही अलका देत असतात.

Source link

By jaghit