Bhushan Desai Will Join Shinde Camp, ठाकरेंना सगळ्यात मोठा धक्का, निष्ठावंत सुभाष देसाई यांच्या सुपुत्राचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश! - maharashtra political happening subhash desai son bhushan desai will join shinde camp big shock to thackeray camp

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून उद्धव ठाकरेंच्या अनेक निष्ठावंतांनी शिंदेंना साथ देण्याचा निर्णय घेतला. अनेक मंत्री आमदार खासदार पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व अमान्य असल्याचं सांगत शिंदेंच्या शिवसेनेचा भगवा हाती घेतला. मात्र या सगळ्यात उद्धव ठाकरेंबरोबर काही जुनी खोडं राहिली होती. त्यात लिलाधर डाके, मनोहर जोशी, सुभाष देसाई अशी मंडळी होती. मात्र आता जुन्या खोडांची पुढची पिढी नव्या विचाराच्या तयारीत आहे. कारण पुढच्या काही तासांत सुभाष देसाई यांचे सुपुत्र भूषण देसाई ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या प्रवेशाला खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असणार आहेत.

भूषण देसाईं शिदेंच्या शिवसेनेत

सुभाष देसाई हे बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात. मात्र, सुभाष देसाईंचा मुलगा भूषण देसाई आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार आहे. भूषण देसाई यांच्या निर्णयामुळं शिवसेनेतल्या फुटीनंतर आणखी एका घरात फूट पडल्याचं दिसून येत आहे. भूषण देसाई एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वातील शिवसेनेत प्रवेश करणार असल्यानं हा ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

कोर्टात द्यायचे पाच लाख घेऊन पोलीस कर्मचारी गायब, लोकेशन शोधत तेलंगणा पोलीस महाराष्ट्रात

एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना आणखी एक धक्का
सुभाष देसाई यांनी सिंधुदुर्गमध्ये झालेल्या सभेत शिवसेनेत पडलेल्या फुटीवर भाष्य केलं होतं. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बळ मिळवून देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असल्याचं ते म्हणाले होते. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर सुभाष देसाई ठामपणे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले होते. आता थेट सुभाष देसाईंच्या मुलाला आपल्या पक्षात शिंदे यांनी ठाकरेंना आणखी एक धक्का दिला आहे.

रिअल लाईफ ‘बधाई हो’! ४७ व्या वर्षी महिलेची दुसऱ्यांदा प्रसुती, २३ वर्षांची लेक म्हणते…

गजानन किर्तीकर शिंदेंसोबत, मुलगा ठाकरेंसोबत
खासदार गजानन किर्तीकर हे सुरुवातीला उद्धव ठाकरे यांच्या गटात होते. ते सातत्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात भूमिका मांडतं होते. अखेर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. तर, त्यांचा मुलगा अमोल किर्तीकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.
पापा, आय हेट यू! तुम्ही मला मुलगी मानलेच नाही, वडिलांना चिठ्ठी लिहून मुलीने संपविले जीवन

Source link

By jaghit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: