रमेश पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांना फोन केला तेव्हा सुरुवातीला आपल्याला राहुल गांधी यांचा भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) हा उपक्रम आवडल्याचे सांगितले. सामान्य लोकांना भारत जोडो यात्रा आवडत आहे. त्यानंतर रमेश पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यापाशी राहुल गांधी यांच्या लग्नाचा मुद्दा छेडला. माझा विषय आहे की, राहुल गांधी साहेबांचे लग्न झाले पाहिजे. भारत जोडो ऐवेजी त्यांनी पहिले घर जोडो अभियान हाती घेतले पाहिजे. हे वाक्य ऐकून बाळासाहेब थोरात यांनाही हसायला आले.
यानंतरही रमेश पाटील हे राहुल गांधी यांनी लग्न का केले पाहिजे, हे बाळासाहेब थोरात यांना पटवून देत होते. राहुल गांधी यांनी कोणत्याही समाजाची बायको करावी, पण आता त्यांनी लग्न करावे. त्यांनाही बायकोचा अनुभव आला पाहिजे ना, बायको कशी असते त्यांनाही समजलं पाहिजे. तसेच मीदेखील राहुल गांधी यांच्याप्रमाणे बेरोजगार असल्याचे पाटील यांनी म्हटले. माझे आईवडील मला सांभाळतात. राहुल गांधी बेरोजगार आहेत, तसा मीपण बेरोजगार आहे. मला पक्षाशी काहीही देणंघेणं नाही. पण किमान यावर्षी तरी राहुल गांधी यांचं लग्न होईल का, असा सवाल पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांना विचारला. राहुल गांधी आता ५० वर्षांचे आहेत. नंतर त्यांना बायकोही मिळणार नाही, असे पाटील यांनी थोरातांना सांगितले. बाळासाहेब थोरात आणि औरंगाबादमधील या व्यक्तीची ही ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
राहुल गांधींचा आईसोबतचा फोटो व्हायरल
राहुल गांधी यांनी कन्याकुमारीपासून सुरु केलेली भारत जोडो यात्रा तामिळनाडू, केरळ ही दोन राज्य पार करुन कर्नाटकमध्ये पोहोचली आहे. सोनिया गांधी आज भारत जोडो यात्रेत जक्कनहळी येथील पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा दररोज २५ किलोमीटरचा टप्पा पूर्ण करते. सोनिया गांधी भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या आणि काही अंतर त्या पदयात्रेत चालत होत्या. यावळी सोनिया गांधी यांच्या पायातील बुटाची लेस सुटली. तेव्हा राहुल गांधी यांनी खाली बसून सोनिया यांच्या बुटाची लेस बांधून दिली. या दोघांचे हे छायाचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.