मंत्री तानाजी सावंत यांनी सुरुवातीलाच माता सुरक्षित तर घर सुरक्षित हे अभियान राबविले. या अभियानाला राज्यभर भरभरुन प्रतिसाद मिळाल्यानंतर आता बालकांसाठी जागृत पालक सदृढ बालक अभियान सुरु आहे. यात राज्यभरात शुन्य ते १८ वयोगटातील लाखो बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. ग्रामीण व मध्यमवर्गीयांच्या दृष्टीने आरोग्य विभाग महत्वाचा असल्याने या विभागात विविध सुधारणा करण्यासह नवनवे उपकरणे, मुबलक औषधींची उपब्धता असण्याकडे सावंत यांचे प्रयत्न असतात, असेही डॉ. सुरेश साबळे यांनी सांगितले.
आज तानाजी सावंत यांचा वाढदिवस बीड जिल्हा रुग्णालयाच्या वतीने मातृ सन्मान दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे. या निमित्त जिल्हा रुग्णालयात जन्मलेल्या मुलींना बेबी किट, मातांना साडी चोळी भेट दिली आहे. नंतर जिल्हाभरात हा उपक्रम राबविला जाणार आहे. मुली व मातांचा सन्मान करुन जिल्हा रुग्णालयाच्या वतीने मंत्री तानाजी सावंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जाणार असल्याचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुरेश साबळे यांनी सांगितले.
तानाची सावंत यांना देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात असताना त्यांचं एक वक्तव्य गाजलं होतं. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात त्यांना आरोग्यमंत्री म्हणून संधी मिळाली आहे. नव्या सरकारमध्ये संधी मिळाल्यानंतर त्यांचं मराठा आरक्षण आणि हापकीन संस्थेबद्दलचं वक्तव्य गाजलं होतं. आता राज्यात औषध खरेदीसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आहे.