balasaheb thorat, पिकाला भाव नाही, शेतकरी संकटात, आजारपणातून सावरताच थोरातांनी सरकारविरोधात 'गिअर' टाकला! - congress balasaheb thorat sudhir tambe agitation against shinde fadanvis government over farmer tears due to low prices

अहमदनगर : शेतकरी संकटात असताना सरकारने त्यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक असते. मात्र मेट्रो आणि स्मार्ट सिटीकडे लक्ष देणार्‍या सरकारचे शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष झालं आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली. आजारपणातून सावरुन थोरात यांनी सरकाविरोधात गिअर टाकला आहे.

संगमनेरमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांसाठी मोर्चा व धरणे आंदोलन झाले. आजारपणानंतर थोरात प्रथमच थेट रस्त्यावरील आंदोलनात सहभागी झाले होते. भाजीपाला, कापूस, सोयाबीन, कांदा या सर्व पिकांचे भाव पडले आहेत. कांदा उत्पादनासाठी खर्च मोठा येत असून यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारने शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल कांद्याला जास्तीत जास्त भाव द्यावा व कोणत्याही शेतकर्‍यांची वीज कनेक्शन कट करू नये, अशी मागणी थोरात यांनी केली.

महाविकास आघाडी सरकार व आघाडी सरकारने कायम शेतकऱ्यांना मदत केली आहे. मात्र सध्याचे सरकार फक्त मेट्रोसिटी आणि मेट्रोवर भर देत असून शेतकऱ्याकडे दुय्यम भावनेतून पहात आहे. कांद्याचे उत्पादन जास्त झाले असून नाफेड कडून कुठेही खरेदी सुरू नाही. महाविकास आघाडी सरकार ज्यावेळेस होते त्यावेळी भाजपवाले मोफत विजेच्या घोषणा देत होते. आता मोफत वीज करून त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपण विधानसभेतही आवाज उठवू आमचा विधानसभेतील आणि जनतेचा रस्त्यावरील दबाव एकत्र मिळून सरकारला चांगले निर्णय घ्यायला भाग पाडू, असा एल्गार थोरातांनी केला.

ते म्हणाले, कांद्याचा प्रश्न सध्या मोठा अवघड झाला आहे. दुष्काळी भागातील शेतकरी मोठ्या खर्चातून कांदा पीक उभारतो. मात्र कमी भाव झाल्याने हे सर्व शेतकरी अत्यंत अडचणीत आहेत. या अडचणीच्या काळात सरकारने शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. महाविकास आघाडी सरकार व आघाडी सरकारने कायम शेतकर्‍यांना मदत केली आहे. कांद्याचे उत्पादन जास्त झाले असून नाफेडकडून कुठेही खरेदी सुरू नाही. कापूस, सोयाबीन, भाजीपाला, वांगे, कांदे सर्व पिकांचे भाव पडले आहेत.

यावेळी डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, माधवराव कानवडे, इंद्रजीत थोरात, बाबासाहेब ओहोळ, मिलिंद कानवडे, सोमेश्वर दिवटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, कपिल पवार, शिवसेनेचे अमर कातारी, नवनाथ आरगडे, निर्मला गुंजाळ, सुनंदाताई जोर्वेकर, मीराताई शेटे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. तांबे म्हणाले, शेतकर्‍यांच्या पिकांना हमीभाव मिळत नाही. शेतकर्‍याची अत्यंत वाईट अवस्था असताना श्रीमंताच्या हिताचे निर्णय भाजप सरकारकडून घेतले जात आहे. कांदा हे नगदी पीक आहे. मात्र कांदा आयातीचे धोरण सरकार घेतले आहे. गहू, साखर आयात करून शेतकर्‍यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम भाजप सरकार करीत आहे. कांदा हे शाश्वत पीक असल्याने अनेक शेतकरी कांदा उत्पादन करत असतात. ज्यावेळी कांदा उत्पादन जास्त होते त्यावर प्रक्रिया उद्योग सुरू करा. विजेचा धोरण निश्चित करा. दिवसा १२ तास वीज द्या अशी मागणी ही आमदार तांबे यांनी केली.

Source link

By jaghit