मी मनापासून बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करते. ठाकरे आणि पवार कुटुंबीयांचे पाच दशकांपासून ऋणानुबंध आहेत. आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जे काही राजकारण होत आहे ते दुर्दैवी असून हे बाळासाहेबांना न आवडणारे आहे. शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदावर उद्धव ठाकरे यांची बाळासाहेब ठाकरे हयात असताना निवड झाली. बाळासाहेबांचे उत्तराधिकारी म्हणून तेव्हाच त्यांची निवड करण्यात आली. मात्र, असे असताना देखील आज शिवसेना तोडण्याचा, फोडण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. त्यांना त्रास देण्याचे काम सुरू आहे, असे सांगतानाच बाळासाहेब ठाकरे यांनाच तुम्ही विरोध करत आहात हे स्पष्ट होत आहे, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
क्लिक करा आणि वाचा- १५ वर्षांत टायफाइड, डायरिया हद्दपार होतील; कोव्हॅक्सिनचे निर्माते डॉ. कृष्णा एम. एल्ला यांचा विश्वास
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भारतीय जनता पक्षात सातत्याने अपमान होत आहे का, असा प्रश्न विचारला असताना सुप्रिया सुळे उत्तर देताना म्हणाल्या की, त्यांना जर ते अपमान चालत असतील तर आपण काय म्हणायचे.
कात्रज चौकातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी संबंधीत संस्थांची बैठक घेऊन तोडगा काढा- सुप्रिया सुळे
कात्रज चौकात सुरू असलेल्या उड्डाणपूल आणि रस्ता रुंदीकारणाच्या कामामुळे वाहतुकीच्या वेळी प्रचंड कोंडी होत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महावितरण आणि पाणीपुरवठा विभागाची तातडीने बैठक लावून समन्वय साधावा, अशा सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना दिल्या.
क्लिक करा आणि वाचा- गुंडगिरी…, बांगड्या, इशारे; आबा-काकांच्या राजकीय संघर्षाची ठिणगी, दोन ज्युनिअर पाटील आमने सामने
ऐन गर्दीच्या वेळीच दिली कात्रज चौकाला भेट
खासदार सुळे यांनी आज ऐन गर्दीच्या वेळीच सकाळी नऊ वाजता कात्रज चौकाला भेट देऊन येथील वाहतूक कोंडी आणि चालू कामांचा आढावा घेतला. कामांची पाहणी करत त्यांनी अधिकाऱ्यांना कामे त्वरित मार्गी लावण्याचे निर्देश दिले. तसेच महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी या कोंडीवर तोडगा काढण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन काम करणाऱ्या सर्व संबंधित संस्थांची संयुक्त बैठक बोलावून वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था काय करता येईल यावर चर्चा करावी, अशा सूचना दिल्या.
उड्डाणपूल व रस्त्याच्या कामांसह महावितरण, सर्व्हिस रोड, पाण्याची पाईपलाइन अशी सर्वच कामे एकत्रितपणे सुरु आहेत. परिणामी येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे. सर्वच प्रकारचे वाहनधारक, पादचारी, रस्त्यालगतचे व्यावसायिक, दुकानदार तसेच स्थानिक नागरिकांनाही या कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या मध्येच उड्डाणपुलासाठीचे खांब उभे करण्याचे काम सुरू आहे. त्याचवेळी दोन्ही बाजूला सर्व्हिस रस्ता आणि रुंदीकरणही चालू आहे.
क्लिक करा आणि वाचा- पुण्यातील तरुणाची मालवणमध्ये आत्महत्या,अर्धवट जाळलेल्या अवस्थेतील मृतदेहाची हातातील अंगठी वरून पटली ओळख
याचा परिणाम म्हणून वाहतुकीसाठी उपलब्ध असलेला रस्ता अत्यंत अपुरा झाला आहे. इतकेच नाही, तर त्याची दशाही अत्यंत वाईट झाली आहे. यामुळे लहान मोठे अपघात देखील होत आहेत. ही गंभीर बाब आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.