avadhut tatkare, आधी घड्याळ सोडलं, मग शिवबंधन तोडलं, अवधूत तटकरेंच्या हाती आता भाजपचा झेंडा - maharashtra political news shivsena leader avadhut tatkare to join bjp

रायगड : रोहा-श्रीवर्धन मतदारसंघाचे माजी आमदार आणि शिवसेनेचे युवा नेते अवधूत तटकरे (Avadhut Tatkare) शिवबंधन सोडण्याच्या तयारीत आहेत. आज ते भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. मुंबई भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत अवधूत तटकरे आपल्या समर्थकांसोबत भाजपचा झेंडा खांद्यावर घेणार आहेत.

अवधूत तटकरेंच्या पक्षांतरामुळे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईतील वसंत स्मृती येथे भाजप प्रदेश कार्यालयात चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा, आमदार आणि भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर, रवींद्र पाटील, महेश बालदी या पक्षप्रवेशावेळी हजर राहतील.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अवधूत तटकरे यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. ते राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचे सख्खे पुतणे, तर अनिल तटकरेंचे सुपुत्र. अवधूत यांनी रोहा नगरपालिकेचे नगराध्यक्षपद भूषवलं होतं. बारा वर्ष ते नगराध्यक्षपदी होते. त्यानंतर २०१४ ते २०१९ या काळात त्यांनी श्रीवर्धन मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं.

हेही वाचा : राजीनाम्याचं पत्रं हातात पडताच ऋजुता लटकेंचा एल्गार, आयुक्तांना लगावला टोला

२०१९ मध्ये चुलत बहीण अदिती तटकरेंना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली. काही काळ राजकारणापासून दूर राहिल्यानंतर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधलं होतं.

अवधूत तटकरे राजकारणात पुन्हा सक्रिया होत असतानाच राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांची एकी झाल्यामुळे तटकरे नाराज होते. त्यानंतर ते पुन्हा सक्रिय राजकारणापासून दूर गेले होते. अखेर त्यांनी भाजपचा हात हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : अंधेरी पूर्वची जागा एकनाथ शिंदेंनी भाजपला का सोडली? सात कारणांमुळे सूत्र फिरली

Source link

By jaghit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: