Assembly Bypolls, मुक्ता टिळक, लक्ष्मण जगतापांच्या मतदारसंघांची पोटनिवडणूक जाहीर, या तारखांना मतदान आणि निकाल - election commission declared by election on mukta tilak and laxman jagtap assembly constituency of kasaba peth and chinchwad

पुणे : महाराष्ट्र विधानसभेच्या कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या कसबा पेठच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं कर्करोगानं निधन झाल्यानं दोन्ही जागा रिक्त झाल्या होत्या. केंद्रीय निवडणूक आयोगानं या जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. या निवडणुकीसाठी मतदान २७ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. तर, मतमोजणी २ मार्च रोजी होणार आहे. मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप हे भाजपचे आमदार असल्यानं त्यांच्या जागेवर भाजप कुणाला संधी देणार याकडे लक्ष लागलं आहे.

पोटनिवडणुकीचा कार्यक्रम

निवडणुकीची अधिसूचना जाहीर : ३१ जानेवारी २०२३

अर्ज दाखल करण्याची मुदत : ७ फेब्रुवारी २०२३

अर्जांची छाननी : ८ फेब्रुवारी

अर्ज मागं घेण्याची मुदत : १० फेब्रुवारी

मतदान : २७ फेब्रुवारी

निकाल : २ मार्च

औरंगाबादमध्ये हेलिकॉप्टर लँड, राज ठाकरे उतरले, पळशी गावात हुरडा पार्टीत सहभाग

मुक्ता टिळक यांच्या निधनानं कसबा मतदारसंघाची जागा रिक्त

पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार तथा पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचं २२ डिसेंबर रोजी निधन झालं. त्या ५७ वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंजत होत्या. पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भाजपच्या प्रामाणिक कार्यकर्त्या, पक्षादेशाला त्यांनी नेहमी प्रमाण मानून राजकीय जीवनात काम केलं. अगदी कर्करोगाशी झुंजत असताना त्यांनी व्हिलचेअर बसून मुंबईत येऊन राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीकरिता मतदान केलं. त्यांची कर्तव्यनिष्ठा पाहून अनेक जण भारावून गेले होते.

दीड वर्षापूर्वी तरुणावर अंत्यसंस्कार; तो तरुणीसोबत सापडला पुण्यात; मग अंत्यविधी कोणाचे झाले?

लक्ष्मण जगताप यांच्या निधनानं चिचंवडची जागा रिक्त

भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजारामुळे ३ जानेवारी रोजी निधन झाले. पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना ३ जानेवारीच्या सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप हे अनेक दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. ते ५९ वर्षांचे होते. लक्ष्मण जगताप यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून साथ देत नव्हती. अश्यातच पुन्हा त्यांची तब्येत खालावली होती. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले; २ मार्च रोजी निकाल, असा आहे कार्यक्रम

मित्राची लक्ष्मण जगतापांच्या कुटुंबाला साथ, अजित दादा पोटनिवडणूक बिनविरोध करणार?

Source link

By jaghit