anil deshmukh, अनिल देशमुख यांना भाजप प्रवेशाची ऑफर होती, शरद पवारांचा गौप्यस्फोट - i had tortured in arthur road jail where kasab was kept bjp offer me to join party says ncp leader anil deshmukh

वर्धा: अनिल देशमुखांना तुरुंगात जाण्याआधी भाजपकडून पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली होती, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. वर्ध्यातील कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला. अनिल देशमुख यांच्या जवळच्या लोकांवर १३० वेळा धाडी घातल्या जातात, देशात असा प्रकार कुठेही घडला नाही. अनिल देशमुख यांना एकच सांगितले जात होते की, ‘तुम्ही पक्ष बदला, तुम्ही विचार बदला, तुम्ही नेतृत्त्व बदला’. पण त्यावेळी अनिल देशमुख यांनी स्वच्छ मनाने सांगितले की, मी संपूर्ण आयुष्य तुरुंगात घालवेन, पण माझ्या पक्षाची साथ सोडणार नाही. अनिल देशमुख यांनी ती ऑफर धुडकावून लावल्यामुळे त्यांना तुरुंगवास झाला, असे शरद पवार यांनी म्हटले.

यावेळी अनिल देशमुख यांनीही त्या काळातील आपले अनुभव कथन केले. माझ्याकडे समझोत्याचा प्रस्ताव होता. मी समझोता केला असता तर तुरुंगात गेलो नसतो. पण त्यावेळी मी बाहेर पडलो असतो तर महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षांपूर्वीच पडले असते. माझा साहेबांच्या नेतृत्त्वावर विश्वास आहे. मी आयुष्यभर जेलमध्ये जाईन, पण समझोता करणार नाही, असे त्यावेळी सांगितले. आर्थर कारागृहात जेथे दहशतवादी कसाबला डांबले होते, तेथेच डांबून माझ्यावर तडजोडीकरता दबाव आणला, असा गौप्यस्फोटही अनिल देशमुख यांनी केला.

ईडी, सीबीआयच्या भीतीने अनेक आमदार पक्षबदल करुन गेले. माझ्यावरही सातत्याने दबाव आणला जात होता. माझ्यावर १०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले होते. पण आरोपपत्रात माझ्यावर केवळ १ कोटी ७१ लाख रुपयांच्या गैरव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आला. माझा छळ करण्यात आला, पण मी माझ्या भूमिकेवर ठाम राहिलो. अखेर न्यायदेवतेने मला न्याय दिला. न्यायालयाने माझ्याविरोधात पुरावे नसल्याचे स्पष्ट केले, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.

पेढे भरवले, संविधान उंचावलं, अनिल देशमुखांचा बाहेर येताच परमबीर सिंहांवर हल्लाबोल, सचिन वाझेंचा इतिहास काढला

अनिल देशमुखांनाच भाजपमध्ये यायचे होते: गिरीश महाजन

अनिल देशमुख यांच्या दाव्यानंतर भाजप नेते गिरीश महाजन यांनी त्यांच्यावर पलटवार केला. आम्ही अनिल देशमुख यांना कुठलाही प्रस्ताव दिला नव्हता. उलट अनिल देशमुख यांनीच भाजपमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी दोनवेळा आम्हाला तसा प्रस्ताव पाठवला होता. पण ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले. अनिल देशमुख यांची आताही जामिनावर सुटका झाली आहे. त्यामुळे निर्दोष असल्याचे पुरावे आणि कागद त्यांनी ईडीला दाखवावेत, असा सल्लाही गिरीश महाजन यांनी दिला.

वाझेने उल्लेख केलेला ‘नंबर-१’ मी नव्हे तो तर…; अनिल देशमुखांनी नाव घेत केला गौप्यस्फोट

अनिल देशमुखांना मुंबईबाहेर जाण्याची परवानगी

विशेष सीबीआय व विशेष पीएमएलए न्यायालयाने अनिल देशमुख यांना चार आठवडे मुंबईबाहेर जाण्याची परवानगी दिली होती. यानंतर अनिल देशमुख तब्बल २१ महिन्यानंतर नागपुरात परतले. त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली होती. विमानतळाबाहेर त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. यानंतर फुलांनी सजवलेल्या गाडीतून अनिल देशमुख यांची मिरवणूक काढण्यात आली होती.

Source link

By jaghit