Ajit Pawar Met Family of BJP MLA Laxman Jagtap after His Death; जुना साथीदार जग सोडून गेला.... लक्ष्मण जगतापांच्या निधनानंतर अजित पवार कुटुंबीयांच्या भेटीला

पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले. जगताप हे भाजपचे आमदार असले तरी राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याशी त्यांचे कायमच सलोख्याचे संबंध होते. आज अजित पवार यांनी दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हेदेखील उपस्थित होते.

काँग्रेसमधून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात करणारे आमदार लक्ष्मण जगताप हे कधीकाळी राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे सर्वांत जवळचे सहकारी म्हणून परिचित होते. १९९९ मध्ये जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याअगोदर १९९३- ९४ मध्ये महापालिकेचे स्थायी समिती सभापती म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. लक्ष्मण जगताप यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात ही काँग्रेस पक्षातून झाली. १९९२ चा निवडणुकीत ते नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर सलग १० वर्ष त्यांनी पिंपळे गुरव येथील प्रतिनिधीत्व केले. याशिवाय १९ डिसेंबर २००० ते १३ मार्च २००२ या काळात पिंपरी चिंचवडचं महापौरपदही त्यांनी भूषवलं होतं.

Thane Metro News: पतीनिधनानंतर एकहाती संसार सांभाळला, पण मेट्रोच्या पिलरखाली कचरा वेचणे जीवावर बेतले

लक्ष्मण जगताप यांना राष्ट्रवादीकडून २००४ मध्ये मावळ लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करत शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी शेकापच्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली. मात्र त्या निवडणुकीत जगताप यांचा पराभव झाला. २००९ मध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघ अस्तित्त्वात आला आणि लक्ष्मण जगताप पहिल्याच निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आले. पुढे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २०१४ मध्ये त्यांनी भाजपमधून निवडणूक लढवून ते आमदार झाले.

राजकारणात काळानुसार समीकरणे बदलतात, असं म्हटलं जातं. पुणे जिल्ह्याच्या राजकारणात अजित पवार यांचे सर्वांत विश्वासू नेते अशी ओळख असलेल्या लक्ष्मण जगताप यांनी भाजप प्रवेशानंतर देवेंद्र फडणवीस यांचंही मन जिंकलं. मात्र अजित पवार यांच्यासोबतचे त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध कायम राहिले. त्यामुळेच आता जगताप यांच्या निधनानंतर अजित पवार यांनी त्यांच्या कुटुंबीयांची घरी जाऊन भेट घेतल्याचं पाहायला मिळालं.

Source link

By jaghit