Immoral relationship, प्रेयसीचा मुलगा अनैतिक संबंधाच्या सतत आड येत होता, निर्दयी प्रियकराने केले धक्कादायक कृत्य - the boyfriend ended the son of girlfriend who was a hindrance in the immoral relationship

नागपूर :नागपूरमधील नरखेड येथे घक्कादायक घटना घडली आहे. प्रेमाच्या आड येत असलेल्या प्रेयसीच्या मुलाचा प्रियकराने गळा चिरून खून केला. नरखेड पोलीस ठाण्यात अनैतिक संबंधामुळे खुनाची घटना उघडकीस आली. शुभम असे मृत मुलाचे नाव आहे. प्रवीण हिरोडकर असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी याला अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मृत शुभम गावात त्याच्या विधवा आईसोबत राहत होता. शुभम अभ्यास करायचा आणि आई शेतात काम करायची. तर शुभमच्या वडिलांचे निधन झाले आहे. आरोपी प्रवीण हा शेतकरी असून अविवाहित आहे. ही महिला त्याच्या शेतात कामाला जात असे, दरम्यान प्रवीणचे महिलेशी संबंध होते. आरोपीने महिलेशी मैत्री करून तिला आपल्या जाळ्यात ओढलं. त्याने तिला मदत करण्याचा बहाणा करून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

नापास झाला म्हणून वडील रागावले, मुलाला आवडले नाही, तणावात उचलले धक्कादायक पाऊल
शेतात काम करताना आरोपी आणि महिला शरीरसंबंध ठेवत असत. काही दिवसांतच महिला आणि प्रवीणच्या प्रेमप्रकरणाची गावात चर्चा सुरू झाली. ही गोष्ट शुभमच्या कानावर पडताच त्याने आईला प्रवीणशी न बोलण्यास सांगितले, मात्र आईने केवळ मैत्रीचेच बोलणे मांडले. एके दिवशी शुभम घरी नसताना प्रवीण घरी आला. शुभम घरी आला असता त्याला दोघेही घरी सोबत दिसले.

प्रवीणसोबत आईला एकटी पाहून शुभमला राग आला. त्याने प्रवीण आणि आईला शिवीगाळ केली. आईचे अफेअर सुरू आहे, त्याने प्रवीणला संबंध तोडण्यासाठी वारंवार गळ घातली. आईचा प्रियकर प्रवीण याने शुभमला नात्यात ढवळाढवळ न करण्याची धमकी दिली होती.

बोरघाट भीषण अपघात: मुंबईतील दिंडोशीत शोककळा, कोवळ्या वयात घेतला जगाचा निरोप
गुरुवारी शुभमने प्रवीणच्या अवैध संबंधाला विरोध करत आईला मारहाण केली. ती रडतच घरातून निघून गेली. त्याचवेळी प्रवीण त्यांच्या घरी आला. त्याने शुभमला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकत नसल्याचे पाहून त्याने शुभमचा गळा आवळून खून केला. गावात जोरदार चर्चा झाली. त्यामुळे नरखेड पोलिसांनी या घटनेची खबर पसरताच आरोपी प्रवीण याला अटक याला पोलिसांनी अटक केली.

सावनेर रेल्वे स्थानकावर मोठा अपघात; तीन तरुणांना रेल्वेची धडक, दोघांची प्रकृती चिंताजनक

Source link

By jaghit