मुंबई:शिक्षकांनी परीक्षेदरम्यान कॉपी करताना पकडल्याच्या नैराश्यातून एका १६ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील चेंबूर परिसरात ही घटना घडली आहे. ही अल्पवयीन मुलगी नवव्या वर्गात शिकत होती. परीक्षेदरम्यान शिक्षकांनी तिला कॉपी करताना पकडलं. त्यानंतर या विद्यार्थिनीने थेट आपला जीव दिला. याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.चेंबूरमध्ये राहणारी ही १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी नवव्या वर्गात शिकते. सध्या शाळेत परीक्षा सुरु आहे. यावेळी पेपर देत असताना शिक्षकाने या अल्पवयीन मुलीला कॉपी करताना पकडलं. त्यानंतर शिक्षकाने तिच्या पालकांना बोलावलं. विद्यार्थिनीच्या आईला शिक्षकाने तिने पेपरमध्ये कॉपी केल्याची माहिती दिली. त्यानंतर या घटनेने विद्यार्थिनी नैराश्यात गेली.
नवनिर्वाचित सरपंचाची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या; भर चौकात आधी रेकी, काहीच मिनिटांत हल्ला
या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा त्यांनी विद्यार्थिनी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. तसेच, याप्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.