१७ वर्षीय बाईक चालक बेशुद्ध असून रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ते भरधाव वेगात बाईक चालवत होते आणि दोघांनीही हेल्मेट घातले नव्हते. जेव्हा बाईकचालकाने पुलावर पोलिसांना पाहिलं, तेव्हा त्याने अचानक यू-टर्न घेतला, त्याच वेळी नियंत्रण गमावून त्यांची बाईक पुलाच्या रेलिंगवर आदळली आणि दोघेही रस्त्यावर खाली फेकले गेले. बाईकस्वाराच्या डोक्याला दुखापत झाली असून त्याच्यावर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मंगळवारी संध्याकाळी धुलिवंदन आणि “बडी रात” या इस्लाम धर्मीयांच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर बाईकस्वारांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस पश्चिम द्रुतगती महामार्गावर सी लिंकच्या दिशेने गस्त घालत होते. बुधवारी पहाटे दोघे बाईकस्वार वांद्रे येथील उड्डाणपुलावरून गेले.
बाईक चालक तरुण अल्पवयीन असल्याने पोलिसांना पाहून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अल्पवयीन तरुण वैध परवान्याशिवाय बाईक चालवत होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
पोलीस उपनिरीक्षक शंकर पाटील यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, बाईकस्वाराने पोलिसांना पाहून एसव्ही रोडकडे जाण्यासाठी त्वरित उजवीकडे वळण घेतल्याने हा अपघात झाला. त्याने आपत्कालीन ब्रेक दाबल्याने बाईक घसरली, त्यामुळे त्याचे नियंत्रण सुटले.
अजित दादांनी दिवसभर फिल्डिंग लावली, फडणवीसांनी एक फोन केला आणि रात्रीत कार्यक्रम झाला