woman lost life, स्वत:च्याच शेतात अखेरचा श्वास; उडीद पिकाची मळणी सुरु असताना साडी अडकली अन्... - woman lost life after stuck in malani yantra in bhandara

भंडारा: शेतातील उडीद पिकाची मळणी सुरू असताना मळणी यंत्रात साडी सापडून एका महिलेचा गुरफटून मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील दोनाड येथे घडली. शीतल धर्मशील कोचे, (वय ५२ वर्ष) असे मृतक महिलेचे नाव आहे.

भंडारा जिल्ह्याला धान पिकाकरता ओळखले जात असले तरीही हिवाळ्यात येथील शेतकरी उडीद, सोयाबीन, वाटाणा, हरभरा अशा विविध पिकांची लागवड करतो. साध्या या पिकांची काढणी झाली असून त्याची मळणी करणे सुरू आहे. लाखांदूर तालुक्यातील दोनाड निवासी शीतल धर्मशील कोचे यांनी स्वतःच्या शेतातील उडीद पिकाची लागवड केली होती. ज्याची कापणी झाल्यावर त्यांनी मळणी करण्यासाठी रुपचंद बगमारे यांची ट्रॅक्टर मागविले आणि मळणी सुरू केली.

तू माझ्यासाठी काय करु शकते, पत्नी म्हणाली जीवही देऊ शकते; मग त्याने तिच्याच ओढणीने…
घटनेवेळी शीतल मळणी यंत्र आणि ट्रॅक्टरच्या मधोमध उभी असताना तिची साडी लोखंडी सॉफ्टिंगला अडकली आणि त्यात शीतल ओढल्या गेली. यात शीतल ही मळणी यंत्रात गुरफटल्याने शीतलचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती गावात पोहचताच ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे एकच गर्दी केली.

लाखांदूर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. यावेळी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून लाखांदूर पोलीस पुढील तपास करीत आहेत. शीतलच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कोल्हापूरला दर्शनाला जात होते, ओव्हरटेकच्या नादात ट्रेलरला धडक, भीषण अपघातात तिघांचा जीव गेला

Source link

By jaghit