एक भाऊ चुलीवर फराळच बनवत होता. तर दुसऱ्या भावाला मॅगी बनवायची होती. या वरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. एकाने किरकोळ कारणावरुन भावाला थेट लाकडी दांड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. भावाच्या मारहाणीत तो जखमी झाला आहे. वाळूज नजिकच्या शिवराई येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्ता नारायण धोतरे (रा.न्यु शिवराई ता. गंगापूर, जि.औरंगाबाद) असे आरोपी भावाचे नाव आहे. तर पोपट नारायण धोत्रे वय ३२ वर्ष, (रा.न्यु शिवराई तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद) असे जखमी भावाचे नाव आहे.
वाचाः पुणेः जन्मदात्या आईनेच नवजात मुलीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकले, पण…
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, दत्ता आणि पोपट हे दोघेही सख्खे भाऊ आहेत. सकाळी पोपट हा घरातील चुलीवर फराळ बनवीत होता. त्याच दरम्यान तेथे दत्ता आला. दत्ताला मॅगी बनवायची असल्याने त्याने भावाला तुझं काम लवकर पूर्ण कर, असं म्हणत घाई करायला सुरुवात केली.
वाचाः सहलीचं निमित्त ठरलं अन् मुलावर काळाचा घाला; बापाच्या डोळ्यांदेखत लेकाचा मृत्यू
मात्र, पोपटचे चुलीवरील काम पूर्ण झाल नव्हतं. त्यामुळे संतापलेल्या दत्ताने वाद घालण्यास सुरुवात केली. वाद इतका विकोपाला गेला की दत्त ने घरातील लाकडी दांडा आणून पोपटला मारहाण करण्यात सुरुवात केली. या मारहाणीत पोपटच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या असून या प्रकरणी पोपटच्या फिर्यादिवरून वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाचाः मुंबई – आग्रा महामार्गावर भीषण अपघात, नाशिक पोलिसांची गाडी तीन वेळा उलटली अन्…