Jawahar Navodaya Vidyalaya Ahmednagar, ३५ वर्षांच्या आठवणींना उजाळा देत मैत्र उर्जेने अविस्मरणीय ठरला जवाहर नवोदय विद्यालयाचा स्नेहमेळा - jawahar navodaya vidyalaya sneh mela became unforgettable with friendly energy reliving the memories of 35 years

अहमदनगर : जवाहर नवोदय विद्यालयाचा (टाकळी ढोकेश्वर जि. अहमदनगर) माजी विद्यार्थी मेळावा ११ डिसेंबर रोजी विद्यालयाच्या प्रांगणात पार पडला. या मेळाव्याला माजी विद्यार्थ्यांनी आवर्जून हजेरी लावून चांगला प्रतिसाद दिला. १९८७ साली सुरू झालेल्या या शाळेचे विद्यार्थी आज अनेक क्षेत्रात यशस्वीपणे स्थिरावले आहेत. कोणत्याही शाळेसाठी त्यांचे यशस्वी विद्यार्थी म्हणजे मोठी उपलब्धीच. आज हेच माजी विद्यार्थी शालेय व्यवस्थापनाच्या खांद्याला खांदा लावून अशाच यशस्वी विद्यार्थ्यांची नवी पिढी घडविण्यासाठी सज्ज आहेत.

कार्यक्रमाचं निमित्त होतं शाळेने आणि माजी विद्यार्थी संघाने आयोजित केलेल्या “मैत्र ऊर्जा २०२२” या स्नेहमेळ्याचे. देश-परदेशातून आलेले हे माजी विद्यार्थी आपल्या शाळेचा कानाकोपरा बघत बालपणीच्या आठवणीत रममाण होताना दिसत होते. करोनाच्या संकटानंतर तीन वर्षांनंतर विद्यालयात प्रथमच स्नेहमेळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

अखेर शिंदे सरकारला जाग आली; ‘निर्भया’तील वाहने पुन्हा महिलांच्या सुरक्षेसाठी तैनात
मैत्र ऊर्जा २०२२ चे प्रास्ताविक विद्यालयाच्या प्राचार्यांनी केले. याप्रसंगी माजी विद्यार्थी संघाच्या वतीने शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. याच मुहूर्तावर माजी विदयार्थी संघाच्या अधिकृत संकेतस्थळाचे अनावरण विद्यालयाचे प्राचार्य एस.पी.बोरसे, अल्युमनी फौंडेशनचे अध्यक्ष श्री. प्रशांत पाचवे, सचिव नयुम तांबोळी, प्रिया हारके आणि इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी विद्यार्थिनी दिपाली राजळे लिखित निशिगंध कविता संग्रहाच्या प्रती विद्यालयाच्या ग्रंथालयासाठी देण्यात आल्या. विद्यालयातील विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी उच्च शिक्षण आणि रोजगार याबाबतचे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन माजी विद्यार्थी संघाच्या वतीने विविध क्षेत्रात काम करत असलेले सदस्य अनिल मोरे आणि गिरीश काळे यांनी केले. सूत्र संचलनाची जबाबदारी विकास कोळेकर यांच्या सोबत राजश्री सगळगिळे यांनी सांभाळली.

विद्यालयाबाबत असलेली आत्मीयता, आपली शाळा आणि आपले बालमित्र यात हरवून गेलेले माजी विद्यार्थी आपण एकमेकांना पुन्हा भेटूया असं आश्वासन करत स्नेहमेळ्याचा समारोप करण्यात आला.

राज्यपालांचा निषेध ; पुणे बंद , मार्केट यार्ड मधील व्यापाऱ्यांचा पाठिंबा

Source link

By jaghit