bharat jodo yatra in maharashtra, Video: 'भारत जोडो' यात्रेत राष्ट्रगीताऐवजी वाजलं भलतंच गाणं; राहुल गांधींही पाहतच राहिले - nepal national anthem played in rahul gandhi bharat jodo yatra in washim

वाशिमः काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो (Bharat Jodo Yatra) यात्रा सध्या विदर्भात असून बुधवारी वाशीम जिल्ह्यात राहुल गांधी यांनी सभा घेतली. मेडशी येथे गांधी यांची एक सभा पार पडली. मात्र, या सभेत एका घटनेमुळं मोठा गोंधळ उडाला आहे. या घटनेमुळं राहुल गांधींवर भाजपने निशाणा साधला आहे. तर, सोशल मीडियावर राहुल गांधींना ट्रोल करण्यात येत आहे. (Rahul Gandhi Bharat Jodo Yatra)

वाशिममध्ये झालेल्या सभेत भारताच्या राष्ट्रगीताच्याऐवजी भलतंच गाणं वाजल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. व्यासपीठावर भारताचे राष्ट्रगीत वाजवण्यास सांगण्यात आलं होतं. त्यावेळी राहुल गांधींसह सर्वजण राष्ट्रगीतासाठी उभे राहिले होते. पण त्याचवेळी राष्ट्रगीताऐवजी दुसरंच गाणं वाजू लागलं.

वाचाः महाराष्ट्रातील ‘या’ गावात किशोरवयीन मुलांच्या मोबाईल वापरावर बंदी; असा निर्णय का घेतला?

राष्ट्रगीतासाठी सगळे उभे असताना अचानक वेगळंच गाणे सुरू झाले. व्यासपीठावर चक्क नेपाळचे राष्ट्रगीत वाजू लागले. सुरुवातीचे काही सेकंदे फक्त गाण्याचे संगीत होते. त्यानंतर जेव्हा गाण्याचे बोल सुरू झाले. तेव्हा राहुल गांधी व व्यासपीठावरील इतर नेत्यांच्या लक्षात आले. हे भारतीय राष्ट्रगीत नसून दुसरंच गाणं आहे. त्यानंतर तातडीने राहुल गांधींनी हे गीत थांबवण्यास सांगितलं. सोशल मीडियावर सध्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

भाजप नेत्यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे. तसंच, या घटनेवरुन राहुल गांधींवर टीका केली आहे. सोशल मीडियावरही हा व्हिडिओ मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला असून ट्रोलर्सने राहुल यांच्यावर निशाणा साधला आहे.

वाचाः आफताबला शिक्षा मिळवून देणारा पुरावा हाती; श्रद्धा प्रकरणात पोलिसांना मोठे यश

वाचाः मॅडम, मी खूप मोठी चुक केलीये…; पालक सभेपासून वाचण्यासाठी ९वीच्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल

Source link

By jaghit