maharashtra tomato rate today, टोमॅटोची आवक वाढली; एका दिवसात ८० रूपयांवरून दर घसरून नवा दर आहे... - in maharashtra tomato prices fell as arrivals increased raising farmers concerns

नाशिक : टोमॅटोच्या बाजारात मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत आला आहे. टोमॅटो जास्त प्रमाणात उपलब्ध झाल्याने टोमॅटोच्या दराची मोठी घसरण झाली आहे. ८० रुपयांवरून टोमॅटोचे दर २५ ते ३० रुपयांवर आले आहेत, त्यामुळं शेतकरी आता आर्थिक संकटात सापडला आहे. टोमॅटोची निर्यातही मंदावली आहे त्यामुळे टोमॅटो इथेच राहिल्याने टोमॅटोच्या दरात परिणाम झाल्याचं समोर येत आहे. मागच्या आठ ते दहा दिवसांपासून दर निम्म्यावर आले आहेत.

नाशिक मार्केट यार्ड, गिरणारे, पिंपळणारे या टोमॅटोच्या प्रमुख बाजारपेठा असल्याने या ठिकाणी अनेक टोमॅटोचे व्यापारी आहेत. या ठिकाणाहून टोमॅटो हे राज्यातील विविध ठिकाणासह परराज्यात आणि परदेशात पाठवले जातात. परंतु ही टोमॅटोची निर्यातही काही दिवसांपासून मंदावली आहे. राज्यबाहेरून टोमॅटो बाजारपेठेत दाखल झाल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचा टोमॅटो हा नाशकातच राहिल्याने त्याचा भाव मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.

Weather Alert: कडाक्याच्या थंडीत राज्यात होणार पाऊस, ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा
नाशिकमध्ये सध्या स्थितीला मध्य प्रदेश आणि कर्नाटकातून टोमॅटो मोठ्या प्रमाणात येत आहे. नाशिकमधील भाजीपाल्याची बाजारपेठही राज्यातील अग्रगण्य बाजारपेठ असून या ठिकाणाहून विविध प्रकारचा भाजीपाला टोमॅटोसह फळभाज्या या बाहेर पाठवल्या जातात. परंतु, आता नाशिकमधून होणारी टोमॅटोची निर्यात कमी झाल्याने सध्या बाजारात टोमॅटोची आवक वाढली आहे.

बाजारात जास्त प्रमाणात टोमॅटो उपलब्ध झाल्याने टोमॅटोच्या दरात घसरण झाली आहे. टोमॅटोचे दर ८० वरून २५ ते ३० रुपयांवर गेले आहेत. टोमॅटोचे दर आणखी घसरू शकतात अशी शक्यता टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळं टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना आणखी आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. अगोदरच अवकाळी पावसामुळे संकटात असलेला टोमॅटो उत्पादक शेतकरी आता टोमॅटोच्या दरात घसरण झाल्याने अजूनच संकटात सापडला आहे . त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यावर दुहेरी संकट ओढवले गेले आहे.

नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड केली जाते. त्यामुळे नाशिकच्या बाजारपेठेत टोमॅटोची कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असते. परंतु आता बाहेरील राज्यातूनदेखील टोमॅटो दाखल होऊ लागल्याने नाशिकमधील टोमॅटोच्या बाजारपेठातील टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे दर कमी झाल्याने परिणामी याचा फटका टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे.

एकुलत्या एका मुलावर जीवापाड प्रेम, तरी आई-वडिलांनी ८ लाखांची सुपारी देऊन केलं ठार; कारण…

Source link

By jaghit