ज्या महिलेच्या दोन्ही किडन्या काढून घेण्यात आल्या त्या महिलेचे नाव सुनिता असे आहे. मुझफ्फरनगरच्या शासकीय रुग्णालयातील बेडवर आपल्या चिमुकल्या तीन मुलांसह पहुडलेल्या सुनिता या आता एखाद्या देवदूताची वाट पाहत आहेत. कोणीतरी देवदूतासारखा यावा आणि त्याने आपल्याला किडनी दान करावी, याची त्या वाट पाहत आहेत. तो नुसता येऊ नये तर त्याच्या किडन्या आपल्या रक्तगटाशी जुळाव्यात असेही सुनिता यांना वाटत आहे. कारण केवळ यामुळेच सुनिता यांचे प्राण वाचू शकणार आहेत.
क्लिक करा आणि वाचा- धक्कादायक! शिक्षक आणि विद्यार्थिनीचे जुळले प्रेम, संयम सुटला आणि दोघे क्लासरूममध्ये नको ते करताना पकडले गेले
दोन्ही किडन्या नसल्याने सुनिता दिवसेंदिवस मरणाच्या जवळ जात आहेत. येणार कोणता दिवस, कोणती तारीख आणि कोणता क्षण सुनितासाठी अखेरचा ठरेल हे कोणीही सांगू शकणार नाही, अशी परिस्थिती आहे.
नेमकं काय घडलं ?
सुनिता यांच्या गर्भाशयाला जंतूसंसर्ग झाला होता. त्यावर उपचार करण्यासाठी त्यांना शहरातील बरियापूर चौकाजवळ असलेल्या शुभकांत नावाच्या एका खासगी नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले. सुनिता यांची तब्येत अधिकच खराब होती. त्यानंतर तेथे डॉ. पवन कुमार यांनी ऑपरेशनची आवश्यकता असल्याचे सांगितले. आता जे डॉक्टर सांगतील ते रोग्याला ऐकावेच लागते. सुनिता आणि त्यांच्या कुटुंबीयांनी गर्भाशयाचे ऑपरेशन करण्याचे ठरवले.
क्लिक करा आणि वाचा- अकोल्यात खळबळ! नोकरीच्या आमिषाने तरुणांची लाखोंची फसवणूक, दिलं जातं बनावट नियुक्तीपत्र, मोठं रॅकेट सक्रिय?
ऑपरेशननंतर काढून घेतल्या दोन्ही किडन्या
ऑपरेशन करणे हा केवळ किडनीचोरीचा बहाणा होता हे लक्षात यायला उशीर झाला होता. तेथे बनावट डॉक्टरने ऑपरेशनच्या नावाखाली सुनिता यांच्या दोन्ही किडन्या काढून घेतल्या. कोणत्याही व्यक्तीला किडन्यांशिवाय जगणे अशक्यच असते. आता सुनिता यांच्या शरीरात किडन्याच नसल्याने ते आजारी पडल्या आहेत.
पाटणा येथे झाला चोरीचा उलगडा
ऑपरेशननंतर सुनिता यांची तब्येत सुधारण्याऐवजी ती अधिकच बिघडू लागली. आता सुनिता यांच्यासह त्यांचे सर्व कुटुंबीय देखील काळजीत पडले. सुनिता यांना उपचारासाठी पाटण्याला पाठवण्यात आले. मात्र तेथे तपासणी झाल्यानंतर सुनिता यांच्या दोन्ही किडन्या नसल्याचे निष्पन्न झाले.
क्लिक करा आणि वाचा- इच्छेविरुद्ध लग्न, पती १७ वर्षांनी मोठा, पत्नीने प्रियकरासाठी पतीला संपवले, पतीच्याच मोबाइलवर शोधले मार्ग
मानवाधिकार आयोगाने घेतली दखल
सध्या सुनिता यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही किडन्या नसल्याने त्यांची स्थिती नाजूक आहे. त्याचे रोजच्या रोज डायलिसीस करावे लागत आहेत. दरम्यान, या प्रकरणाची मानवाधिकार आयोगाने दखल घेतली आहे. या प्रकरणी आयोगाने जिल्हा प्रशासन, रुग्णालय प्रशासनाला नोटीस बजावली आहे.